प्रभाग क्र. ४ मधील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरला नागरीकांचा विरोध – काम तातडीने बंद करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
510
Google search engine
Google search engine
तिव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामावर स्थगिती आणून काम तातडीने बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना शनिवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे. अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
  शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या सरकारी दवाखान्याच्या डॉक्टर रेसिडेंटच्या खाली खुल्या जागेवर बीएसएनएलचे मोबाईल टावरचे काम चालू आहे. त्या प्रभागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता सदर मोबाईल टॉवरचे काम चालू आहे. या मोबाईल टावरच्या रेंजमुळे प्रभागातील नागरिकांना ब्रेन हॅमरेज आणि कॅन्सरसारखे महाभयानक आजार होऊ शकतात. त्यामुळे सदर कामावर स्थगिती आणून काम तातडीने बंद करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या प्रभागातील नागरिकांनी मुख्याधिकार्‍यांना दिला आहे. यावेळी मधुसूदन बैस, सतिष जैन, अभिषेक जैन, कीर्ती जैन, रुपेश बढीया, प्रशांत बैस, अनिल जोशी,  राजेश बेलसरे, राहुल खुरपडे, अंकित खाकोले, एस. बी. बेलसरे,  विनोद गणेडीवाल, निना नरेश पोफळे, गौरव बगाडे, सुरेश खेतान,  शितल बेराड, दत्ता कोरडे, किरण अग्रवाल आदींची उपस्थिती होती. सदर कामाच्या स्थगितीच्या प्रयत्नासाठी नागरीकांना परिसरातील नगरसेवकांचे सहकार्य मिळत आहे.