बाळापूर पोलिसांनी 24 तासात लावला चोरीचा शोध-चोरट्यासह 1 लाखाचा मुद्देमाल ताब्यात

0
657

 

अकोला/प्रतिनिधी –
दिनांक 28।6।19 रोजी वाडेगाव येथील वासुदेव नारायण पाल्हाडे हे नेहमी प्रमाणे 9 बकऱ्या घेऊन सकाळी 10 वाजता चारण्या साठी घेऊन गेले, संध्याकाळी 4 वाजता वाडेगाव कडे बकऱ्या सह परत येत असतांना चांनी फाट्या जवळ रोडवर अचानक एक इंडिगो कार येऊन थांबली व त्या मधून दोन व्यक्ती उतरून त्यांनी एक बकरी पकडून गाडीत कोंबली व बाळापूर कडे कार भरधाव वेगाने घेऊन गेले , त्यांनी ह्या बाबत फिर्याद बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये नोंदविली असता पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी तपास चक्रे फिरवून संशया वरून अश्या प्रकारचे काम करणाऱ्या शेख रहीम शेख कली म ह्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी भाषेत विचारले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याचे कडून 3 बकऱ्या व 1 इंडिगो कार एकूण किंमत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, त्याचे इतर साथीदारां चा शोध घेण्यात येत असून आरोपी ची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख , पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक पडघन, पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार, गावंडे हे करीत आहेत