घुईखेड जि.प. शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत – जि. प. सदस्या सौ. राधिका घुईखेडकर यांच्याहस्ते पुस्तके वाटप

0
537
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
     चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना जि. प. सदस्या सौ. राधिका प्रविण घुईखेडकर यांच्या शुभहस्ते पुस्तके वाटप करण्यात आले.
     यावेळी जिल्हा परिषद सदस्या राधिका घुईखेडकर, उपसरपंच रसीका मेश्राम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिलनकर, मुख्याध्यापक कु. गायकवाड, सहाय्यक शिक्षिका गोठाने, कु. डाहे,  स. शिक्षक कोल्हे, कुरवाडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींची उपस्थिती होती.