सिंदेवाही तालुक्यातिल शेतकर्‍यांना तहसीलदार पाठक यांचे आवाहन

0
490
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- केंद्र सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली असून त्या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मुदतीत मिळाला पाहिजे यासाठी सिंदेवाही तहसील चे तहसीलदार मा. अमोल पाठक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील संपुर्ण शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान सन्मान योजना सुरू केली असून त्याची गावपातळीवर अमलबजावणी करण्यासाठी त्या, त्या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, तसेच सहकारी संस्था यांचे सचिव गावपातळीवर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे काम करीत आहेत. तरी सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येत आहे की, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक याच्या झेरॉक्स कॉपी संमंधीत कर्मचारी यांचेकडे लवकरात लवकर जमा करावे असे आवाहन मा. अमोल पाठक, तहसीलदार – सिंदेवाही यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा हिच अपेक्षा.