आषाढी एकादशी महापर्वात श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री राम कथा ज्ञानयज्ञ

0
1483

ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय कथा वाचन

वारकऱ्यांसाठी चहा,नाश्ता, भोजन व राहण्याची व्यवस्था

अकोट ता. प्रतिनिधी

तालुक्यातील योगयोगेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज शेटे यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय श्री राम कथा चे आयोजन आषाढी एकादशी महापर्व काळावर श्री क्षेत्र पंढरपूर येथे करण्यात आले आहे ही रामकथा दिनांक ८ जुलै ते १३ जुलै आषाढी यात्रे दरम्यान पार पडणार आहे.

विशेष म्हणजे कथाश्रवण करण्यात येणाऱ्या वारकऱ्यांची राहण्याची व चहा नाश्ता भोजनाची व्यवस्था आयोजकां द्वारा करण्यात येत असून वारकऱ्यांना कथे दरम्यान दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या किर्तन तथा भजनांच्या कार्यक्रमाचाही आनंद घेता येणार आहे.

गणेश महाराज शेटे यांच्या वाणीतील ही कथा ८ जुलैपासून चंद्रभागेच्या तीरावरील दीनदयाल महादेव मंदिर कॉटेज हॉस्पिटल जवळ पंढरपूर येथील कथा स्थळी होणार आहे. राम कथा ज्ञानयज्ञातील कीर्तन मालेत ह भ प शिवा महाराज बायस्कर दि. ९ जुलैला अरुण महाराज बुरघाटे दि.१० जुलै विठ्ठल महाराज साबळे दि.११ जुलै अरुण महाराज लांडे दि. १२जुलै तुकाराम महाराज चौवरे दि. १३जुलै गजानन महाराज हीरुळकर दि. १४ जुलै रमेश महाराज ईस्तापे दि.१५ जुलै आदी नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत.तर रात्री ७ ते ९ या दरम्यान राम कथा वाचन होणार आहे. आषाढीच्या या पुण्य पर्व काळात या रामकथेचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे आव्हान आयोजक ह भ प गणेश महाराज शेटे यांनी केले असून सहभागी होण्यासाठी तथा अधिक माहितीसाठी 9834621159,9767112112 या क्रमांकावर संपर्क करण्याची आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.