ठाणेदार शेळके यांची अमरावतीला बदली – संतोष भंडारे चांदूर रेल्वेचे नवीन ठाणेदार

0
1258
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे -Shahejad Khan – 

चांदूर रेल्वेचे ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांची जवळपास २७ महिण्यानंतर मंगळवारी बदली करण्यात आली असुन त्यांच्या जागी बढती घेऊन ठाणेदार झालेले संतोष भंडारे हे चांदूर रेल्वेचे नवीन ठाणेदारपदी रूजु होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

मुंबईवरून ठाणेदार ब्रम्हदेव शेळके १४ मार्च २०१७ रोजी चांदूर रेल्वेच्या ठाणेदार पदाचा पदभार स्विकारला होता. त्यांनी बराच मोठा कार्यकाळ चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये काढला. मंगळवारी त्यांची अमरावती येथे कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी सहाय्यक ठाणेदार पदावरून ठाणेदार पदावर बढती मिळविलेले संतोष भंडारे चांदूर रेल्वेचे नवीन ठाणेदार असणार आहे. आज बुधवारी शेळके हे नवीन ठाणेदार भंडारे यांच्याकडे पदभार सोपवू शकतात.