संदीपभाऊ गड्डमवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी – कार्यकर्त्यांची मागणी

0
517
Google search engine
Google search engine

*आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणूकित संदीपभाऊ गड्डमवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभेतून निवडणूक लढविण्याची मागणी एकमताने सर्व कार्यकर्त्यांनी केली .

सिंदेवाही येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हा सूर काढला .*
*ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हा विकासापासून दूर राहिला असून पाहिजे तसा विकास झालेला नाही . ही विधानसभा सत्तेपासून नेहमी दूर राहिली असून विकासाचे महामेरू म्हणवणाऱ्यांनी सुध्दा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास करू शकले नाही अशी खंत सुद्धा उपस्थितीतांनी व्यक्त केली.*
*यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी आता आमचं ठरलं ! तुम्ही सुद्धा ठरवून घ्या ! असा नारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार, यावेळी ज्येष्ठ नेते बाबूरावजी गेडाम, दामोधर ननावार युवा नेते अभिजित मुप्पीडवार,बाबूलालजी डांगे,मनोज सैनी, राजेश्वर गायकवाड ,जगदीश मोहुर्ले, कमलाकर बोमनपल्लीवार,राजू वानखेडे, विनोद भाऊ चंदनखेडे, राजुभाऊ ताडाम ,आकाश पगाडे,अनिल जनबंधू ,सुधाकरराव जी खरात,अंकित पिलारे प्रामुख्याने उपस्थित होते.