मोर्शी – वरुडमध्ये उद्यापासून भाजप सदस्य नोंदणी कार्यक्रम-विधानसभेत 11 हजार सदस्य करण्याचा निर्धार

0
605
Google search engine
Google search engine

वरुड :-

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र भगवा फडकवण्यात यश आलेल्या भारतीय जनता पक्षाने कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांवर डोळा ठेवला आहे. येत्या ६ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक बुथवर ५० नवीन सदस्य करण्यावर भर देण्यात येईल.

भाजपने २०१४ मध्ये मिळालेल्या यशानंतर जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून सदस्य नोंदणीसाठी अभियान राबवले. यात सुमारे १४ कोटी सदस्य करण्यात आले. नागपूर, महाराष्ट्रासह सर्वत्र विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली. ६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान राबवण्यात येणाऱ्या अभियानात हा आधार राहणार असला तरी, नवीन लोकांना पक्षाचे सदस्य करण्यावर भर राहील. यात डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील, प्राध्यापकांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना जवळ करण्याचे प्रयत्न होतील.

भाजपचे संघटनात्मकदृष्ट्या मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व औरंगाबाद असे पाच विभाग आहेत.

भाजपचे सदस्यत्व ६ वर्षांसाठी असते. सद्य:स्थितीत १ कोटी ७ लाख सदस्य आहेत. त्यात आणखी निम्मे नवीन सदस्य जोडण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल ५० लाख नवीन सदस्य तयार करण्याचे टार्गेट संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आले असल्याचे समजते. राज्यात ९५ हजार बुथ असून प्रत्येक बुथवर ५० नवीन सदस्य जोडण्यात येतील. ५ बुथवर संघटनेची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना शक्ती केंद्र प्रमुख नियुक्त केले आहे. यातून विस्तारकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यातील २० हजार शक्तिकेंद्रांवर विस्तारक जाणार आहेत. ७ दिवस बुथ पातळीवरील सदस्य व मतदार नोंदणी कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करतील.
सदर कार्यक्रम 6 जुलै पासून सुरू होत असून कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे व जिल्हाध्यक्ष दिनेशजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी विधानसभेमध्ये 11 हजार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजप युवा मोर्चाने ठेवले आहे, व भाजयुमो तर्फे जोरात तयारी सुरू आहे, मोर्शीला रामजी बाबा चौक, जयस्तंभ चौक व गुरुदेव प्रार्थना मंदिर येथे नोंदणी होणार असून त्यांचे उदघाटन मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरनीच्या अध्यक्षा डॉ. सौ. वसुधाताई बोंडे, नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, व विस्तारक राम जोशी ह्यांच्या हस्ते होणार आहे. तर ग्रामीणमध्ये जिल्हापरिषद गावामध्ये तालुकाध्यक्ष अजय आगरकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येईल.
वरूड मधील केदार चौक येथे भव्य भाजप सदस्यता नोंदणी कार्यक्रम भाजयुमो वरुड ग्रामीण व शहर तर्फे करण्यात आले आहे. ह्याचे उदघाटन नगराध्यक्षा सौ. स्वातीताई आंडे, भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष राजू सुपले हस्ते होणार आहे. शेंदुरजनाघाट येथे शिवसेना चौक येथे होणार असून त्याचे उदघाटन नगराध्यक्ष रुपेश मांडवे व भाजप शहराध्यक्ष निलेश फुटाणे ह्यांचे हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हाथ मजबूत करण्यासाठी व ह्या मजबूत महाराष्ट्रच्या विकासाचे साथीदार होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी केले आहे.