मराठा आरक्षणात कुणबी जातीला समाविष्ट करा- अमरावती येथे पत्रकार परिषद

286
जाहिरात

*अमरावती* :- सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.९ ऑगस्ट २०१६ ला मराठा क्रांती मुक मोर्चाची सुरवात झाली आणि महाराष्ट्र सह देशात विविध ठिकाणी मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले आणि त्याची फलश्रुती म्हणुन आज शासन निर्णय न्यायालयात कायम राहत मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत अनुक्रमे १३ आणि १२ टक्के आरक्षण मिळाळे.

आज मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाल्याने जवळपास साडेचार कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळाले,यात राज्य मागास आयोगाने महत्वाची भुमिका बजावली यापुर्वी मंडळ आयोग,राष्टीय मागास आयोग,खत्री आणि बापट आयोगाला जे जमले नाही ते काम एम. जी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमलं यात जे पुरावे त्यांनी गोळा केले त्यात महत्वाचा भाग म्हणजे कुणबी आणि मराठा समाज एकच आहे,यात कुणबी असलेल्या आणि मराठा असलेल्या परिवारांचे रोटी-बेटी व्यवहार आहेत हे आयोगाने स्पष्ट केले याचा अर्थ कुणबी आणि मराठा यात कुठलाही भेद नाही,विदर्भातील मराठा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या सांगण्यावरून कुणबी शब्द आपल्या कागद पत्रात लिहु लागल्याने त्याला उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजा सारखा संघर्ष करावा लागला नाही. कुणबी समाजाला आरक्षण हे देखील मंडळ आयोगानुसार मिळाले त्यापुर्वी कुणबी बिगर आरक्षित होता.

आज शासनाने मराठा आरक्षण देऊन आणि न्यायालयात योग्य बाजु मांडुन आरक्षण कायम ठेवलं त्याच अनुषंगाने कुणबी या घटकाला आता मराठा आरक्षणाच्या प्रवर्गात आणावे अशी मागणी सकळ मराठा समाज अमरावती यांच्या वतीने आम्ही करत आहे.या संदर्भात लवकरच आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे.आणि आमच्या या भूमिकेला संपुर्ण विदर्भातून आणि विविध कुणबी संघटनेचा पाठिंबा आहे तरी शासन दरबारी आम्ही हि मागणी मांडणार आहे.

*अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि डॉ पंजाबराव देशमुख वसतीगृह योजना कुणबी समाजाला लागू करा*

महाराष्ट्र शासनाने ज्या मराठा क्रांती मोरच्याच्या मागण्या होत्या त्यातील शैक्षणिक आणि आर्थिक सुविधा मान्य केल्या मात्र त्या केवळ मराठा समाजाला लागु केल्याने मराठा मोर्चाच्या माध्यमातून लागू झालेल्या योजनांपासुन कुणबी समाज वंचित आहे . *तरी शासनाने मागील काळात निर्गमित केलेले व येत्या काळात मराठा मोर्चा मधील मागन्यांमधील जाहीर होणाऱ्या शासन निर्णयात मराठा , कुणबी , मराठा-कुणबी ,कुणबी – मराठा असा उल्लेख करावा जेणेकरुन या योजना विदर्भात चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील*.

*स्व.संजय बंड यांच्या स्मृती प्रित्यर्थ सकळ मराठा समाजाच्या वतीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र करण्याचे काम सुरु असून येणाऱ्या काळात मराठा-कुणबी जातीतील तरुणांना याचा लाभ घेता येईल*

या पत्रकार परिषदेत उपस्थित नितीन पवित्रकार राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा , नितीन देशमुख ,राजुभाऊ पाटील, बंडोपंत भुयार , छायाताई देशमुख , स्वप्नील धोटे , अमोल देशमुख , सुभाष धोटे , अॅड रुपेश सवाई , महेश तराळ, राजेंद्र ठाकरे, विशाल पवार , नितीन धर्माळे , राहुल इंगळे, आकाश वडतकर , रोशन घोरमाडे ,अंकुश डहाके ,वैभव देशमुख ,भूषण काळे ,अंकुश डहाने,गिरीश सोळंके आदी उपस्थित होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।