नवीन ठाणेदार संतोष भंडारे यांनी स्वीकारला पदभार – शहरातील शाळा, महाविद्यालयाला दिली भेट

0
673
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
    चांदूर रेल्वे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांच्या अधिसूचनेप्रमाणे अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये चांदूर रेल्वेचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांना हटवून त्यांना कोर्ट पैरवी अधिकारीपदी नियुक्ती केले. त्यांच्याजागी नंदुरबार वरून डॅशिंग पोलिस अधिकारी संतोष भंडारे यांना बढती देऊन चांदूर रेल्वेच्या ठाणेदार पदी नियुक्त केले. नवनियुक्त ठाणेदार भंडारे यांनी पूर्व ठाणेदार शेळके यांच्याकडून पदभार घेताच पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी ट, कर्मचारी यांची ओळख करून पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांचा समाधान झाले पाहिजे व जनताभिमुख पोलिसिंग वर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
      यानंतर ठाणेदार भंडारे यांनी शहरातील शाळा, महाविद्यालय तथा जेथे जास्त गर्दी व वाहतुकीची वर्दळ असते अशा ठिकाणची पाहणी करून व्यवस्थेबाबत सक्त निर्देश सुध्दा दिले. यादरम्यान त्यांनी काही नागरिकांची संवाद साधून पोलीस स्टेशनशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची माहिती द्यायची असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदारांनी केले. त्यामुळे अशा डॅशिंग पोलिस ऑफिसर कडून चांदूर रेल्वे वासियांच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अपेक्षा वाढल्या आहे.