निलेश विश्वकर्मा यांनी केली बैलजोडी हाकलत पेरणी – चांदूर रेल्वे तालुक्यात पेरण्यांना आली गती

0
927
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –  शहेजाद खान
अनेक लोकप्रतिनीधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आंदोलने करतात, अनेक मागण्या शासनापर्यंत पोहचवितात. तर काही लोकप्रतिनीधी केवळ फोटो काढण्यापुरता शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता असल्याचा आव आणतात. परंतु यापेक्षाही काही वेगळे करून शेतकऱ्यांप्रती आपल्या भावना व्यक्त करणारे व्यक्ती आहेत. शहरातील जय हिंद क्रिडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी चक्क बैलजोडी हाकलत शेतातील अनेक तासामध्ये पेरणी करीत घाम गाळला. या कामामुळे निलेश विश्वकर्मा यांची अनेक जागी चर्चा होत असुन प्रशंसा करीत असल्याचे चित्र आहे.
आठवडाभरापासून होत असलेल्या पावसानंतर खरीप हंगामातील पेरणीला चांदूर रेल्वे तालुक्यात गती आली आहे.  मागील वर्षी या काळात जवळपास शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पेरणीला उशीर झाल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, हा अंदाज चुकला असल्याचे समजते. पावसाचे आगमन उशिराच झाले. मागील वर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली आहे. पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यामुळे यंदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्‍यता तशी कमीच असल्याचे समजते. त्यामुळे आता चांदूर रेल्वे तालुक्यातील पेरण्यांना गती आली असुन शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीने पेरणी करीत असल्याचे चित्र आहे. अशातच शनिवारी शहरातील जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी चक्क बैलजोडीने शेतात पेरणी करून आपला वेगळा परिचय शेतकऱ्यांमध्ये करून दिला.