जि.प. शाळा धानोरा म्हाली येथे शिक्षण परिषदचे आयोजन साहित्य प्रदर्शनी : सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला निरोप समारंभ

0
858
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, धानोरा म्हाली येथे 2019-20 शैक्षणिक सत्रांतर्गत  शिक्षण परिषद घेण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सदाशिवराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिक्षण परिषदे च्या दरम्यान साहित्य प्रदर्शनीचे उदघाटन त्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती नरसिकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश खानजोडे, उपाध्यक्ष साजिकभाई व इतर सदस्य उपस्थित होते.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षकांच्या सक्षमीकरण करता शिक्षण परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे. दोन सत्रात घेण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेतील प्रथम सत्रात  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बासलापूर येथील आदर्श शिक्षक कुशल व्यास यांनी इंग्रजी भाषेचे लेखन व त्यातील मुलांची प्रतिभा या विषयावर मार्गदर्शन केले. लीप फॉर वर्ड  या उपक्रमामुळे मुलांमधील इंग्रजी विषयाची भीती नाहीशी होऊन मुलं लवकर इंगजी वाक्य शिकायला लागतात. शिवाय विद्यार्थी लवकरच व्याकरणदृष्ट्या इंग्रजी विषयात प्राविण्य होत असल्याचे व्यास यांनी सांगितले. द्वितीय सत्र विज्ञान विषय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 मसुदा या विषयावर विषयतज्ञ वानखडे यांनी घेतले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे  शिक्षण क्षेत्रात  आमुलाग्र बदल होणार असून  यामध्ये नवीन शिक्षण संरचना,  गुणवत्तेनुसार शिक्षक बढती, आर टी ई चा विस्तार, व्यावसायिक शिक्षणावर भर ,शिक्षण संकुल पद्धती , विशेष शिक्षण क्षेत्राची निर्मिती, मुलींच्या शिक्षणावर भर ,आधी विविध विषयांवर वानखडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर केंद्रप्रमुख वंदना शेळके यांनी केंद्र अंतर्गत वर्षभर चालणाऱ्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी सदाशिवराव दाभाडे व विस्तार अधिकारी छबूताई सोळंके यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी विषयनिहाय साहित्याची निर्मिती करून साहित्य प्रदर्शनी भरविली होती.शिक्षण परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता मुख्याध्यापिका रेखा हांडे,उर्मिला गुह्वाने ,पल्लवी देऊळकर, वैशाली ढाकुलकर, प्रेमलता ठाकरे,वंदना दुधे आदींनी परिश्रम घेतले.