युवकांना काँग्रेसी विचारधारेने चालण्याची गरज – तुषार गांधी <> आ. जगताप यांच्याघरी सदिच्छा भेट

0
556
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
आजचा युवा वर्ग धर्मांध शक्तींकडे वळलेला अजुन जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यामुळे देशाची ताकद असलेल्या युवकांनी आता काँग्रेसी विचारधारेने चालण्याची गरज आहे. कारण काँग्रेसमध्ये धर्मनिरपेक्षता आहे. सलोख्याने राहण्याचे विचार काँग्रेसचे आहे. त्यामुळे हे विचार सगळीकडे पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले. त्यांनी स्थानिक आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्याघरी रविवारी सदिच्छा भेट दिली असता बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांचे उद्दिष्टे केवळ राजकीय नव्हती तर सामाजिक परिवर्तन हे देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात एकमेकांना बद्दल आपुलकीची आणि आदराची भावना वाढविणे हेही त्यांच्या राजकारणातले महत्त्वाचे उद्दिष्टे होते. गांधीजींचा प्रयत्न जातीव्यवस्थेच्या मुळावरच घाव घालण्याचा होता. त्यामुळे देशाला पुढे नेण्यासाठी, प्रगतीपथासाठी युवकांनी धर्मांध सोडून काँग्रेसी विचारधारा अवलंबली पाहिजे असेही तुषार गांधी यांनी म्हटले. यावेळी तुषार गांधी यांच्यासमवेत जेष्ठ पत्रकार अविनाश दुधे, आम्ही सारे फाऊंडेशनचे प्रा. प्रसेनजित तेलंग, भुषण नाचवणकर उपस्थित होते. यादरम्यान तुषार गांधी यांचा प्रा. वीरेंद्र जगताप व कार्यकर्त्यांकडून यथोचित सत्कार करण्यात आला व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रा. वीरेंद्र जगताप, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव वाघ, बंडूभाऊ देशमुख, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, परिक्षीत जगताप, नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, सतपाल वरठे, महेश कलावटे, बंटी माकोडे, हमीद कुरैशी, अविनाश वानरे, शहेजाद सौदागर, राजु लांजेवार यांसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.