भाजपा सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ – आ. अरूण अडसड यांची उपस्थिती

0
1198
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
    स्थानिक भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण यांच्यावतीने रविवारी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून विधानपरिषद आमदार अरूण अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक जुना मोटर स्टँड येथे सदस्य नोंदणी करिता सुरुवात करण्यात आली.
     याप्रसंगी धामणगाव विधानसभा विस्तारक दिलीप मोरे, भाजपा तालुका अध्यक्ष आशुतोष गुल्हाने, माजी शहराध्यक्ष प्रसन्ना पाटील चौधरी, तालुका सरचिटणीस संदीप सोळंके, विवेक बोबडे, केशव वंजारी, जेष्ठ कार्यकर्ते उत्तमराव ठाकरे, अॅड. राजीव अंबापुरे, देवशंकर विश्वकर्मा, सचिन लांजेवार, विलास तांडेकर, बबनराव गावंडे, नरेंद्र बांडबैल, रवींद्र उपाध्ये, मिसाळ, शिरभाते, ग्रामीण महिला आघाडी अध्यक्ष लता बागडे, नगरसेविका सुरेखा तांडेकर, नीलिमा शर्मा, दिपाली मिसाळ, अपर्णा जगताप, नंदा माने, संगीता बाबर यांसह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.