चांदूर रेल्वे नगर परिषद द्वारा हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण – आ. जगताप यांच्याहस्ते वृक्षारोपण

0
487
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan )
   महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करून होणारे बदल, प्रदूषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. राज्यभरात लोकसहभागातून वृक्ष लागवडीचे हरित मिशन राबविले जात आहे. त्या अनुषंगाने चांदूर रेल्वे नगरपरिषदेला ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त असून नगरपरिषद क्षेत्रात विविध ठिकाणी नगरपरिषद व्दारे वृक्षारोपण करण्यात आले.
   शहरातील हुतात्मा स्मारक येथे शनिवारला नगर परिषद तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार जगताप यांच्यासह नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नगरसेवक महेश कलावटे, प्रणव भेंडे, शुभांगी वानरे, नीलिमा शर्मा, स्वाती माकोडे, कल्पना लांजेवार,  दिपाली मिसाळ, शबाना परवीन अब्दुल हमीद कुरेशी, संजय पूरसाम आदींनी वृक्षारोपण केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे असे मत उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी श्री. गजभिये, राहुल इमले, अरुडकर, कुकडकर, भाग्यश्री चांदोरे, नितीन इमले, चवरे, जितेंद्र कर्से, अरके, वाघ, पटले, गणोरकर, वानखडे, गिरी, कर्से आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.