महेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहिर

205

महेंद्र धुरगूडे , उपेंद्रक कटके ,शिवाजी जाधव यांना
राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कार जाहिर

उस्मानाबाद /प्रतिनिधी

सर्वाेत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सर्वोत्तम पुरस्कारासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, भूमचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) निलंगा (जि. लातूर) येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

निलंगा येथील सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ठ राजकारण, समाजकारणी म्हणून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, उत्कृष्ठ शिक्षण प्रशासक म्हणून भूमचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, उत्कृष्ठ पत्रकार उपेंद्र कटके, उत्कृष्ठ तलाठी रमेश कुंभार (सज्जा तडवळा, ता. तुळजापूर) आदर्श शिक्षक कदमवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बापूराव मोरे, यशस्वी उद्योजक दत्ता देविदास गोरे(माळी), संस्थाचालक बावीच्या वसंत आश्रमशाळेचे मनोहर राठोड यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी निलंगा येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे, डॉ. विठ्ठल लहाने, शाहू कॉलेजचे सचिव डॉ. अनिरुद्ध जाधव आदींच्या हस्ते रविवारी पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।