सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे सत्कार व गुणवंतांचा सोहळा

0
602
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- सिंदेवाही नगर पत्रकार संघाच्या वतीने १४ जुलै रोजी नवनिर्वाचित खासदार अशोक नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सत्कार व १० वि व १२ वी च्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, राज्य पातळीवर, देश पातळीवर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, स्वच्छता दुत, सामाजिक दायीत्वात अग्रेसर समाजसेवक, सुवर्ण पदक विजेता, फेलोशिप पुरस्कार प्राप्त व्यक्ति. पुरस्कार प्राप्त – ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, नवोदय विद्यालय प्रवेश प्राप्त विद्यार्थी, शिषुवृती प्राप्त विद्यार्थी, उत्कृष्ट कलावंत बाल तबलावादक यांचे सत्काराचा कार्यक्रम जैस्वाल मंगल कार्यालय येथे दुपारी ४:००वाजता आयोजित केला आहे.

सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेश सोलापन उद्घाटनप्रसंगी अतुल देशकर, सह उद्घाटक संदिप गड्डमवार तर स्वागताध्यक्ष म्हणून योगेंद्र जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख विशेष अतिथी म्हणून भैय्याजी बेहरे, प्रंशात परदेशी, अमोल पाठक, निशिकांत रामटेके, अशोक इल्लूरवार, अंकिता पाटील, अरूण गोंड, गिरीश बारसागडे, व्हि जंगिलवाड, मंगेश वासेकर, डॉ नागदेवते व गिरीश धायगुडे हे शासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सिंदेवाही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व सत्कारमूर्ती चे भव्य स्वागत करण्यात येत असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे करण्यात येत आहे.