गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात

0
1226

जळगाव :-

केसीई सोसायटी संचालीत गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात आषाढी एकदशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेचे शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ,पाऊले चालती पंढरीची वाट , ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम , ज्ञानबा तुकाराम या नामघोषणांनी टाळ मृदगाच्या तालावर पाऊली खेळत दिंडी काढून पंढरीची आठवण करून दिली.
प्रभात कॉलोनी मधील विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेऊन चिमुकल्यांनी फराळाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.