*धारणी येथे पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेची स्थापना.* —◆◆◆—◆◆◆— *#अनेक पत्रकारांनी घेतला प्रवेश *धारणी (अमरावती) : समाज व

0
582
Google search engine
Google search engine

*धारणी येथे पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेची स्थापना.*
—◆◆◆—◆◆◆—
*#अनेक पत्रकारांनी घेतला प्रवेश
*धारणी (अमरावती) : समाज व पत्रकार हे दोन्ही शब्द एकमेकांशी निगडित आहे कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, तो समाजातील चांगल्या आणि वाईट परंतू समाजाच्या बाजूने मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतो. पारदर्शक बातमीतूनच समाजातील सत्यता – असत्यता मांडण्याचा प्रयास असतो, म्हणुनच पत्रकार लोकशाही समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणुन संबोधला जातो. शेवटी पत्रकार हा एक सर्वसामान्य व्यक्ती असतो व समाजात वावरतांना त्याला अनेक नाना प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागतात, पण या सर्व समस्यांना तोंड देणे व समाजात पत्रकाराचे काही विशेष असे अधिकार व हक्क प्राप्त करणे एकट्या पत्रकारास अवघड जाते, म्हणुनच या पत्रकारांची बाजु मांडण्याकरीता त्यांना अधिकार व हक्क प्राप्त करुण देण्याच्या उद्देशाने द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन हि पत्रकार संघटना आज संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर काम करीत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील धारणी येथे द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशन या पत्रकार संघटनेची विश्राम भवनात नुकतीच बैठक संपन्न झाली, या बैठकीला द पॉवर ऑफ मिडीया फाउंडेशनचे राज्य संघटक तथा संस्थापक मा. संदीपजी बाजड, विदर्भ प्रदेश सदस्य उत्तम ब्राम्हणवाडे, जिल्हा अध्यक्ष उमेशजी लोटे, जिल्हा उपाध्यक्ष म.वकील दानिश, जेष्ठ पत्रकार रमेशजी मालवीय, शहर उपाध्यक्ष सतीशजी वानखडे, जिल्हा सदस्य राजेशजी मालवीय, शकीलजी अहमद, आशिषजी गवई हे उपस्थित होते, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी धारणी येथील ज्येष्ठ पत्रकार रमेशजी मालवीय हे होते. तर यावेळी धारणी येथील बैठकीत अनेक नामवंत पत्रकारांनी पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेत जाहीर रित्या प्रवेश घेतला, तसेच या पत्रकार संघटनेची स्थापना सुद्धा केली.*

*जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राबाहेर अल्पावधीतच नावलौकिक झालेल्या द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या पत्रकार संघटनेने शहरी भागासह ग्रामीण गावातील पत्रकार, साहित्यिक, कवी, वृत्तपत्र वितरक, केबल ऑपरेटर,जाहिरातदार यांना अधिक महत्व दिले आहे. या पत्रकार बैठकीला पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक सदस्य व राज्य संघटक संदीपकुमार बाजड, विदर्भ कोअर कमेटी सदस्य उत्तमजी ब्राम्हणवाडे, जिल्हा अध्यक्ष उमेशजी लोटे, जिल्हा उपाध्यक्ष म.वकील दानिश, जेष्ठ पत्रकार रमेशजी मालवीय, शहर उपाध्यक्ष सतीशजी वानखडे, जिल्हा सदस्य राजेशजी मालवीय, शकीलजी अहमद, आशिषजी गवई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थीत होते, या बैठकीला धारणी येथील पत्रकार सर्वश्री जेष्ठ पत्रकार रमेशजी मालवीय, रवी नवलाखे, हौसिलालजी मालविय, संजय लायदे, वकील श्यामकांतजी पांडे, शकीलजी अहमद, राजेश मालविय, दिपक मालविय, सुलेमान मेमन, राजा उर्फ धमेंद्र पाटील, पाराशर बुलबुले, पंकज लायदे, संदिप राऊत, प्रतिक मालविय, सुरेंद्र देशमुख, सागर गुप्ता, प्रविण सदाफळे, वृत्तपत्र वितरक सुधिर चौरागडे, केबल ऑपरेटर जुगलकिशोर जैस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्र संचालन तस्मीन शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन पाराशर बुलबुले यांनी केले.*