आज अचलपुरात भव्य रक्तदान, निशुल्क 16 आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबीर-पॉवर ऑफ मीडिया व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे आयोजन

0
1276

निवासी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते उदघाटन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल उपआयुक्त बावणे उपस्थित राहणार

भारतातील प्रसिद्ध ओंचोलॉजिस्ट हेड नेक तसेच फेस कॅन्सर तज्ञ डॉ. रणजितजी मांडवे यांची विशेष उपस्थिती, स्वतः करणार कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणी.

विशेष प्रतिनिधी /

*जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन आणि उपजिल्हा रुग्णालय अचलपूर यांच्या संयुक्त तत्वावधानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे करण्यात आलेले आहे.*
*📌एकदा रक्तदान केल्याने आपण तीन व्यक्तींचे प्राण वाचू शकतो शिवाय आपण दर तीन महिन्यांनी रक्तदान केल्यास शरीर सुदृढ राहते त्यामुळे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून गोरगरीब व गरजूंना आपल्या रक्ताचे दान करून त्याचे जीवन वाचवावे.*
*त्यासोबतच आज सोमवार रोजी होऊ घातलेल्या शिबिरामध्ये पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी कॅन्सर सहित 16 प्रकारची तपासणी शिबिर, नेत्र शिबिर, चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, या शिबिराचा लाभ सर्वसामान्य जनतेने सुद्धा घ्यावा असे आवाहन पॉवर ऑफ मीडिया आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.*

*अचलपूर येथील भव्य रक्तदान शिबीर व निशुल्क तपासणी शिबीराचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी डॉ. नितीनजी व्‍यवहारे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती महसूल उपायुक्त गजेंद्रजी बावणे हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदरजी निकम, भारतातील प्रसिद्ध ओंचोलॉजिस्ट हेड नेक तसेच फेस कॅन्सर तज्ञ डॉ. रणजितजी मांडवे, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावतीचे विधी अधिकारी धनंजयजी तोटे (वकील), अचलपूर तालुक्यातील समाजसेवी अशोकजी वसुले, अचलपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंदजी वानखडे, उपजिल्हा रुग्णालय अचलपूरच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सर्वत वर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेराज अली, द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे राज्य संघटक तथा संस्थापक सदस्य संदीपकुमार बाजड, विदर्भ कोअर कमिटी सदस्य तसेच प्रकल्प प्रमुख उत्तमजी ब्राम्हणवाडे, अमोलजी नानोटकर, पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती जिल्हाध्यक्ष उमेशजी लोटे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.संगीताताई ढोके /भेंडे (मोर्शी), अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष सुरेंद्रजी बिसने, जिल्हा सरचिटणीस सुभाषजी कोटेचा (चांदुर रेल्वे), उपाध्यक्ष गजानन देशमुख (दर्यापूर), देविदास सूर्यवंशी (अमरावती), वकील दानिश (नांदगांव खंडेश्वर), संजयजी खासबागे (वरुड), जिल्हा सदस्य व पत्रकार प्रकाशजी गुळसुंदरे (परतवाडा), आशिषजी गवई (परतवाडा), डॉ.कुशलजी लोटे, राजेश्वरजी घोरमाडे (मोर्शी), ऋषिकेशजी वाघमारे (अंजनगाव सुर्जी), बादलजी डकरे (चांदुर बाजार), मनोजजी शर्मा (चिखलदरा), शकीलजी अहमद (धारणी), मोहनजी राऊत, प्रदीपजी भुसारी, राजेशजी चौबे, संजयजी पांडे, छगनजी जाधव (धामणगांव रेल्वे), राजेशजी मालवीय (मेळघाट), चंद्रकांतजी भड (वरुड) धीरजजी मानमोडे, संदीपजी शेंडे (अमरावती), रुपेशजी वाळके (मोर्शी), संतोषजी शिंदे (भातकुली), जिल्हा महिला सचिव मीनाक्षी करवाडे (अमरावती), महिला अमरावती शहर अध्यक्षा मंजुताई ठाकरे, उपाध्यक्षा मीनाक्षी कोल्हे, जिल्हा समन्वयक ज्योतीताई बोराडे, राहुलजी टेकाडे (अमरावती), यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.*

*भव्य रक्तदान शिबिर व निशुल्क तपासणी शिबिर उत्तमरित्या पार पाडण्यासाठी अचलपुर – परतवाडा तालुका अध्यक्ष पंकजजी साबू, परतवाडा शहराध्यक्ष प्रा. जयकुमारजी चर्जन, अचलपुर शहराध्यक्ष फिरोजजी खान, तसेच पत्रकार सुनीलजी देशपांडे, जयकुमारजी घिया, विनयजी चतुर, राहुलजी घाटे, रुपेशजी बाजपेयी, कैलासजी पेंढारकर (जेष्ठ साहित्यीक), संजयजी डोंगरे, राजेशजी वानखेडे, सचिनजी रावेकर, विलासजी थोरात, सतीशजी अकोलकर, अब्दुल शाकीरजी, योगेशजी खानझोडे, अजयजी केजरीवाल, निखिलजी ठाकूर आणि एडवोकेट प्रशांत घाटे यांच्यासह द पावर ऑफ मीडिया फाउंडेशन तसेच उपजिल्हा रुग्णालय अचलपूरचे पदाधिकाऱ्यांनी व सदस्य प्रयत्न करीत आहेत.*