अचलपूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार यांची गर्दी काहींना उमेदवार मिळेना तर काही कडे उमेदवार यांची नावाची लांबच यादी बादल डकरे:- चांदुर बाजार

0
1814
Google search engine
Google search engine

अचलपूर मतदार संघात विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार यांची गर्दी
काहींना उमेदवार मिळेना तर काही कडे उमेदवार यांची नावाची लांबच यादी

बादल डकरे:- चांदुर बाजार

लोकसभा निवडणुकीत महायुती च्या  मिळविलेल्या उत्तुंग भरारीनंतर अचलपूर  विधानसभा मतदार संघात अनेक इच्छुकांना आमदारकिचे स्वप्न पडायला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळावे असे अनेकांना वाटत असल्याने मतदारांसह पक्षश्रेष्ठींशी संपर्क वाढवण्यात गुंतले आहे. तालुक्यातील इच्छुक उमेदवार उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेने गडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.
विद्यमान आमदार   बच्चू कडू पुन्हा निवडणुक लढवतील तर भाजपाकडून उमेदवारी कोणाला मिळेल यासाठी तालुकावासीयांसह अनेक  इच्छुकांनाही उत्सुकता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे   उमेदवारी ही अशोकराव बन्सोड याना मिळाली होती. आमदार कडू  यांच्या विरोधात लढताना बन्सोड यांना सुमारे 10 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे बन्सोड यांना पुन्हा संधी मिळू शकते.
जनसंपर्क हेच आगामी काळात यशाचे सुत्र असणार हे गृहित धरून इच्छुक उमेदवार अशोकराव वसुले यांनी तालुक्यात  आपला चांगला जनसंपर्क वाढविला आहे.तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळीक असल्याने यांच्या नावाची सुध्दा जोरदार सुरू आहे.
भाजपच्या चांदुर बाजार पंचायत समिती चे उपसभापती नितीन टाकरखेडे,चांदुर बाजार नगरपरिषद चे अध्यक्ष ,रविंद्र पवार ,प्रमोदराव कोरडे,यांची चांदुर बाजार तालुक्यातून जोरदार चर्चा सुरू आहे.

तर कॉग्रेस कडून बबलू देशमुख यांचे नाव जरी निश्चित असले तरी राजेंद्र गवई सुद्धा आपली ईच्छा दर्शवित आहे.मागील 15 वर्षांपासून दोन्ही राष्ट्रीय पक्ष याना या मतदारसंघात यश प्राप्त करता आले नाही.त्यामुळे हा मतदार संघ शिवसेना-भाजपा युती मध्ये शिवसेने कडे जाण्याची चर्चा आहे असे झाली तरी शिवसेना कडून नंदकुमार वासनकार यांची सुद्धा चर्चा सुरू आहे.तर रयत संघटना प्रमुख राहुल कडू सुद्धा मतदार संघात शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांशी जवळीक वाढत आहे.