शिष्य होणे म्हणजे काय ?

0
843

आध्यात्मिक उन्नती करू इच्छिणार्‍या साधकाच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अधिक असतेपण गुरूंचे मन जिंकण्यासाठी चांगला शिष्य होणेही आवश्यक असतेशिष्यत्वाचे महत्त्वइतर नाती आणि शिष्य यांच्यातील भेद (फरकतसेच गुरु कोणाला करावेयाविषयीची तात्त्विक माहिती पुढील लेखातून समजून घेऊया.

. ‘शिष्य’ या शब्दाची व्याख्या आणि अर्थ

आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जो गुरूंनी सांगितलेली साधना करतोत्याला शिष्य असे म्हणतातकुलार्णवतंत्रात शिष्याची व्याख्या करतांना म्हटले आहे,

शरीरमर्थप्राणांश्च सद्गुरुभ्यो निवेद्य यः । गुरुभ्यः शिक्षते योगं शिष्य इत्यभिधीयते ।।

अर्थ जो तनधन आणि प्राण (म्हणजे सर्वस्वगुरूंना समर्पण करून त्यांच्याकडून योग शिकतो (म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना करतो), त्याला शिष्य म्हटले जाते. (म्हणूनच बायकोमुलांना अगदी वार्‍यावर सोडून जरी शिष्य गुरूंकडे गेलातरी त्याला पाप लागत नाही.)

शिष्यत्वाचे महत्त्व

देवऋषिपितर आणि समाज ही चार ऋणे शिष्याला फेडावी लागत नाहीत.

गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा ।

शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रततपांसि च ।। १५१ ।। – श्री गुरुगीता

अर्थ गुरुपुत्र या पदवीस योग्य असा गुरुसेवक शिष्यव्यवहारात भोळसट असलातरी त्याच्या दीक्षाव्रतेतपवगैरे साधना सिद्धीस जातातगुरुसेवक नसणार्‍यांना तसे फळ मिळत नाही.

विद्यार्थी आणि शिष्य यांमध्ये कोणता भेद आहे?

गुरु आणि शिक्षक यांच्यात भेद आहेत्याचप्रमाणे शिष्य आणि विद्यार्थी यांच्यातही भेद आहेशिक्षकाचे शुल्क दिले कीविद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा हिशोब पूर्ण होतोपण गुरु आत्मज्ञानच देत असल्याने गुरूंसाठी काहीही आणि कितीही केले तरी ते थोडेच असतेलहानपणी आईवडिलांनी आपले सर्व केलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण कितीही केलेतरी ते थोडेच असतेतसेच हेही आहे.

माध्यम आणि शिष्य

माध्यम म्हणून एखादा कार्य करतोतेव्हा त्याची प्रगती होत नाहीतो परप्रकाशी रहातोयाउलट गुरु शिष्याकडून कार्य करवून घेताततेव्हा ते शिष्याची क्षमता वाढवतातजसे श्री रामकृष्णांनी विवेकानंदांचे आत्मबल वाढवले आणि मग त्यांच्याकडून कार्य करवून घेतले.’ – .पूभक्तराज महाराज (सनातन संस्थेचे श्रद्धास्थान)

साधक आणि शिष्य

साधकाने स्थूल जगात अडकू नये म्हणून त्याने सगुणाबरोबर निर्गुणतत्त्वाची उपासना करणे आवश्यक असतेगुरुप्राप्ती झाल्यावर सगुणातील निर्गुणाचीम्हणजे मायेतील ब्रह्माचीअनुभूती येण्यासाठी सगुणातील गुरूंची सेवा करणे आवश्यक असते.

गुरुशिष्य नातेच खरे कसे ?

या जगात गुरुशिष्य हे नाते पवित्र मानलेले आहेहे एकच नाते खरे आहेगुरुशिष्य संबंध फक्त आध्यात्मिक स्वरूपाचे असतातशिष्याला ‘माझा उद्धार व्हायला हवा’ ही एकच जाणीव असली पाहिजेगुरूंना एकच जाणीव असते की, ‘याचा उद्धार व्हायला हवा.’ गुरुशिष्याचे नाते हे वयपरत्वे नसतेहे नाते ज्ञानवृद्धि आणि साधनावृद्धि यांच्यावर आधारलेले असतेजीवसृष्टीतील सर्व प्राणी ज्ञान आणि साधना यांच्याच माध्यमातून अभिवृद्धि साधत असतातबाकी सर्व नाती भीतीच्या किंवा सामाजिक बंधनांच्या पोटी आलेली असतातम्हणून त्यांच्याशी व्यवहार सीमित असतोत्या नात्यांत अहंभाव सातत्याने राखला जातोत्या नात्यांत ज्ञान आणि साधनेला किंमत नसतेअहंभाव राखणे म्हणजेच नाती टिकविणेअहंभाव राखणारी सर्व नाती खोटीच असतात.

गुरुप्राप्तीसाठी काय करावे ?

गुरु शोधू नये

सामोरे श्री गुरुदेवरूप आले । ज्ञानचक्षुवीण कैसे कळे ।।

ओळख पटेना जरी तुम्हासी । लीन व्हावे श्रीचरणासी ।

देतील ओळख स्वस्वरूपाची । शुद्ध प्रेमे चित्त वेधी ।।

गुरु शोधून सापडत नाहीतकारण गुरुतत्त्व सूक्ष्मतम आहे आणि साधकाला फक्त स्थूल आणि थोडेफार सूक्ष्म एवढेच कळत असतेअध्यात्मात शिष्याने गुरु करायचे नसताततर गुरुच शिष्य करतातम्हणजे तेच शिष्याची निवड आणि सिद्धता करतातसाधकाचा आध्यात्मिक स्तर ५५ प्रतिशतहून अधिक झाला कीगुरु स्वतःहून त्याच्याकडे येऊन त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात.साधकाचा आध्यात्मिक स्तर ४० प्रतिशत इतका न्यून असला पण त्याचे मुमुक्षुत्व तीव्र असलेतरीही त्याला गुरुप्राप्ति होतेथोडक्यात म्हणजे गुरु शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिष्य म्हणून लायक होण्याचा साधकाने प्रयत्न करावा.

गुरूंची परीक्षा घेऊ नये

विचार करूनम्हणजे डोळसपणे श्रद्धा ठेवायची असे जर ठरलेतर गुरूंची परीक्षा घ्यावी लागेलपरीक्षक हा परीक्षार्थीपेक्षा वरचढ असावा लागतोशिष्य तसा नाहीयासाठी आपण उत्तम शिष्य कसे होऊहा एकच ध्यास साधकाने घ्यावा.

स्वतःच स्वतःला कोणाचाही शिष्य समजू नये

अमुक एका गुरूंचा मी शिष्य आहेअसे समजू नयेगुरूंनी म्हटले पाहिजे कीहा माझा शिष्य आहेएखाद्या तरुणाने मनाशी ठरविले कीअमुक एक तरुणी माझी प्रेयसी आहेतर त्याचा उपयोग नाहीतिनेही तसे म्हटले पाहिजेतसेच गुरुशिष्य संबंधातही असते.

गुरु कोणाला करावे ?

प्रत्येकाने निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य व्हावेनुसत्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी होऊ नयेएकदा तुम्ही निर्गुणाला जाणले कीमगच तुम्हाला सगुणाला ओळखता येईलएकदा तुम्ही निर्गुणाला जाणले कीतुम्ही कुठे आहात हे कळेल. (निर्गुणातल्या गुरूंचे शिष्य म्हणजे निर्गुणाची अनुभूती सतत घेत असलेल्या परात्पर गुरूंचे किंवा नामाचे शिष्य.)

गुरु आणि शिष्य यांचा चार आश्रमांतील आश्रम

ब्रह्मचार्‍याला ब्रह्मचर्याश्रमीवानप्रस्थाश्रम्याला वानप्रस्थाश्रमी आणि संन्यासाश्रम्याला संन्यासाश्रमी गुरु अधिक जवळचे वाटतातगृहस्थाला मात्र ब्रह्मचर्याश्रमीवानप्रस्थाश्रमीसंन्यासाश्रमी किंवा गृहस्थाश्रमी गुरु केलेतरी ते जवळचे वाटतात.