पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण , ४० टक्के पपेरण्यंवर संकट – निघालेले अंकुरही करपण्याच्या बेतात

0
611
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – ( शहेजाद खान )
शेतकऱ्यांसाठी अतिशय लगबगीचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस. या दिवसात पेरण्या करा व नंतर त्या निघालेल्या रोपट्यांची देखभाल करा हाच उद्योग. परंतु यावर्षी विचित्र परिस्थिती निर्माण झालेले दिसत आहे. कारण जून महिन्यात मृग नक्षत्रात पाऊस नसल्यागत असला तरी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि नंतर थोड्या प्रमाणात पाऊस पडला व पेरण्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती. यातील काही बियाणे निघाले तर काही बियाणे जमिनीतच असल्यामुळे ते सडण्याच्या स्थितीत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसत आहे.
या वर्षी मृग नक्षत्र लागल्यापासून किंवा त्या अगोदर पाऊस मुळीच या तालुक्यात आलेला नाही आणि यानंतर मात्र अंश:ता पाऊस पडला व यावर शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्यांना सुरुवात केली. एकुण झालेल्या पेरण्यांपैकी ६० टक्के पेरण्या चांगल्या पद्धतीच्या निघाल्या तर ४०  टक्के पेरण्या जमिनीतच असल्यागत आहे. या निघालेल्या पेरण्या जरी चांगल्या पद्धतीच्या असल्यातरी सततच्या आठ दिवसापासूनच्या कडक उन्हामुळे हे लहान असलेले रोपटेसुद्धा जळत आहे. व जमिनीत असलेले बियाणे निघतांना दिसतच नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तर दुसरीकडे विचार केल्यास बियाणांच्या तथा खतांच्या किमती कुठच्या कुठे पोहोचल्या आहे.  शासनाकडून शेतकऱ्यांवर वेळोवेळी एक प्रकारे अन्यायच झालेला असून आता वरूणराजाही या बळीराजावर कोपल्याचे चिन्ह दिसत आहे. अशा भयानक परिस्थितीत शेतकऱ्यांनी जावे तर कुणाकडे ? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. आधीच बँकांचे कर्ज, यामुळे नवीन कर्ज फार कमी शेतकऱ्यांना मिळाले. कारण शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंत कर्ज माफ झाल्याचे भासवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बँकेपर्यंत कोणतेही आदेश आलेच नाही. अशा परिस्थितीत सापडलेला बळीराजा कुठे आपली गाऱ्हाणी घेऊन जाणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
       चांदूर रेल्वे तालुक्याच्या ठिकाणी बाजारपेठा ठप्प पडलेल्या आहे. कारण शेतकऱ्यांजवळच काही नाही तर मग मजुरांजवळ कुठचे काम येणार ? ह्या अशा परिस्थितीमुळे केवळ शेतकरी हवालदिल झालेला नाही तर व्यापारी सुद्धा हैराण झालेले आहे.  मजुरांचा विचार केल्यास मजुरांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ सोबत डाळ मिळते. यामुळे मजूर फक्त कोमात गेलेला नाही. कारण अन्नधान्य राशन दुकानातून मिळाल्यावर बाकी वस्तु व भाजीपाला कसाही निर्माण करता येतो. परंतु शेतकरी व व्यापारी सध्या खूपच कैचित सापडलेले दिसत आहे.
        अशातच जंगलात वन्य प्राण्यांना खायला काही नसल्यामुळे त्यांचा सुद्धा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. रानडुक्कर, हरिण, रोही, माकडे यांच्या संख्येत एवढी मोठी वाढ झाली आहे. परंतु त्यांचा बंदोबस्त कसा करावा हे समजेनासे झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात डुकरे पाच – पाच फुटाचे खड्डे करून ठेवत आहे. पावसा अभावी सर्व प्राणी गावाकडे धाव घेऊन गावकऱ्यांना सुद्धा हैरान करीत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे रोखीचे पीक म्हणून असलेले संत्रा झाडे. मात्र मागील वर्षीच्या कमी पावसामुळे तेसुद्धा झाडे वाळतांना दिसत आहे व काही शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला पाणी असल्यामुळे थोड्या प्रमाणात संत्रा आलेला असतांना ते संत्री सुद्धा खाली पडत आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे.