सिंदेवाही पोलीसांचे सर्वत्र कौतुक, हरवलेली मुलगी शोधुन काढली दोन तासात

0
515
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाळी नलेश्वर येथील विलास ढोक यांची वैश्णवी नावाची १० वर्ष वयाची मुलगी दिनांक – १४/७/२०१९ रोजी सायंकाळी ४-०० वाजता घरासमोरील अंगणात खेळत होती. खेळता, खेळता ती अचानकपणे गायब झाल्याने व मुलगी दिसुन न आल्याने घरच्यांनी इतरत्र मुलीचा शोध घेने सुरू करून भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांनाही मुलीबद्दल विचारपुस केली. परंतू कुठेही मुलीचा शोध लागला नसल्याने व २४ तासाचा कालावधीही उलटून गेल्याने, भेदरलेल्या आई, वडीलांनी व नातेवाईकांनी दिनांक – १५/७/२०१९ रोजी सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठले व पोलीस स्टेशनला आल्यावर घडलेला प्रकार सांगिला. प्रकरणाचे गांभीर्य व मुलीचे वय लक्षात घेऊन आधिच परिसरात वाघाची दहशत कायम असल्याने स्वतः पोलीस निरीक्षक – निशिकांत रामटेके यांनी दोन अधिकार्‍यांची टिम सोबत घेऊन घटना स्थळाला भेट दिली. व घटनास्थळावरून उपयुक्त माहिती घेऊन वेगवेगळ्या दिशांनी मुलीचा शोध घेन्यासाठी टिम रवाना केली. व सिंदेवाही पोलीस स्टेशनचा संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर अवघ्या दोन तासातच पोलिसांना मुलीला शोधुन काढण्यात यश आले. मोहाळी गावापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पेटगांव या गावात हरवलेली मुलगी मिळून आल्याने पोलीसांनी निस्वास टाकला. मुलीला ताब्यात घेऊन तिला आई, वडीलांचे स्वाधिन करून जनतेप्रती आपले काय कर्तव्य आहे याची प्रघिती आणुन दिली. पोलीसांची समयसूचकता व कर्तव्यदक्षता व वेळीच दाखविलेली कार्यतत्परता यामुळे अवघ्या दोन तासांत मुलीला शोधुन काढल्याबद्दल मुलीच्या आई-वडिलांनी सिंदेवाही पोलीसांप्रती कृतज्ञता व्यक्त करूण आभार मानले. लवकरात लवकर हरवलेल्या मुलीला शोधून काढल्यामुळे सिंदेवाही पोलीसांची सर्त्र वाहवा व कौतुक होत आहे.