*कृषिमंत्री यांच्या घरी येणाऱ्या सर्व आंदोलक शेतकऱ्यांचे भाजप करणार स्वागत-भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राउत यांची माहिती*

0
605
Google search engine
Google search engine

 

*प्रतिनिधी :-*

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानी वरुड तालुक्यातील सर्व विरोधी पक्षीय नेते धोंडी मोर्चा व मुंडण आंदोलन करणार असल्याचे पत्रक विरोधकांनी काढले आहे. परंतु आंदोलनात सर्व सहभागी शेतकऱ्यांचे भारतीय जनता पार्टी वरुड तर्फे स्वागत करण्याचे ठरविले आहे, व स्वागताकरीता कृषिमंत्री यांच्या धर्मपत्नी डॉ. वसुधा बोंडे ह्या उपस्थित राहणार आहे. तरी सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री ना. डॉ. अनिल बोंडे यांच्या वरुड येथील निवासस्थानी हजर राहण्याचे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राउत व शहराध्यक्ष राजू सुपले यांनी केले आहे.

निसर्गाच्या अवकृपेने पावसाळा कमी असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुष्काळाचे चित्र निर्माण झाले होते. परंतु सरकारने त्या तोडगा म्हणून दुष्काळ ग्रस्त तालुक्याकरिता विद्यार्थांना मोफत बस पास, दुष्काळ निधी, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे वीज मोफत अश्या खूप काही योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकर्याना मदतीचा हात दिला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अनिल बोंडे यांची शेतकरी शेतमजूर यांच्या बद्दल असलेली तळमळ पाहता त्यना कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली. व कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे.

विरोशी सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत धोंडी मोर्चा व मुंडण आदोलन करण्याचे ठरविले आहे, प्रश्न हे आंदोलन करून सुटत नसतात. परंतु विरोधकांना कोणता मुद्धा नसल्याने फक्त राजकीय स्टट आहे परंतु त्यांच्या सोबत येणाऱ्या आंदोलक शेतकरी बांधवाकरिता आम्ही सर्व व्यवस्था करणार असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राउत यांनी सांगितले.