फरार अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात

0
552
Google search engine
Google search engine

 

अकोलाःप्रतिनिधी
बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दी मधील दधम येथील राहणारा अट्टल गुन्हेगार श्याम पंजाब ताजणे ह्याचेवर पोलीस स्टेशन बाळापूर येथे, दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न, विनय भंग ह्या सारखे 5 गंभीर गुन्हे सण 2016 ते 2018 दरम्यान दाखल होते, 2017 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्या नंतर जामीनावर बाहेर आल्या नंतर त्याने विनयभंग व खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाल्या पासून मागील एक वर्षा पासून तो फरार होता, त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला जेरबंद करण्या साठी बाळापूर पोलिसांनी बरेच प्रयत्न केले मागे बाळापूर पोलिसांचे पथक पुणे येथे सुद्धा जाऊन आले परंतु तो हाती लागला नाही, काल बाळापूर पोलिसांना माहिती मिळाली की नमूद आरोपी दधम येथे आला आहे, बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक जयसिंग पाटील, पोलीस कर्मचारी डांगे, कायंदे, नागरे ह्यांचे पथकाने त्वरित धाव घेऊन त्याला दधम येथून ताब्यात घेतले, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग पाटील हे करीत आहेत