उत्तरप्रदेशच्या २३ वर्षीय युवकाची सायकलने सप्तपुरी, चारधाम यात्रा – चांदूर रेल्वे नागरीकांनी केले स्वागत

0
558
Google search engine
Google search engine
३१ हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा मानस
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
      आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलचा प्रवास खुपच कमी होत असुन त्याजागी दुचाकीने जागा घेतली आहे. दुचाकीच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असतांना पर्यावरणाचेही त्यासोबत संतुलन बिघडत चालले आहे. परंतु देशहितासाठी उत्तरप्रदेशातील एका २३ वर्षीय युवकाने चक्क सायकलने आपल्या यात्रेला सुरूवात केली असुन मंगळवारी दुपारी तो चांदूर रेल्वे शहरात पोहचला. देशात भाईचारा,अमन – शांती कायम राहावी व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करने हा या सायकल यात्रेचा उद्देश आहे.
          उत्तरप्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील बछरायुं या गावातील २३ वर्षीय शुभम संजीवकुमार शर्मा या युवक १३ मे रोजी बछरायुं येथील ठाणा मंदिर येथे जलाभिषेक करून १२ महा ज्योतिर्लिंग, सप्तपुरी व चारधाम यात्रेला सायकलने सुरूवात केली. सदर युवकाचे वडील संजीवकुमार हे तेथील मंदिरात पुजारी आहे. सदर युवकाने ३१ हजार किलोमीटर सायकलने प्रवास करण्याचे निश्चित केले. यानंतर त्याने आपल्या यात्रेला सुरूवात केली. सायकलवर तिरंगा बांधून पंकज शर्मा हा युवक ६२ दिवसांचा प्रवास करून हैद्राबादमार्गे महाराष्ट्रात यवतमाळवरून चांदूर रेल्वे शहरात आला. चांदूर रेल्वे शहरापर्यंत पंकजने ५ हजार ३६५ किलोमीटरचा प्रवास केला होता. किलोमीटर मोजण्याकरिता सायकलवर डिजीटल मीटर सुध्दा बसविले. पंकजने ही यात्रा देशात सर्व धर्मीयांमध्ये भाईचारा कायम राहावा, जाती – जातीमध्ये तेढ निर्माण करू नका, देशात शांतता कायम राहावी, प्रदुषणाचे प्रमाण वाढले असतांना पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्याचा उद्देश असल्यामुळे सुरू केल्याचे सांगितले. दररोज १०० किलोमीटरचा प्रवास करून एखाद्या मंदिरात किंवा पोलीस स्टेशन परिसरात रात्रीचा मुक्काम पंकज शर्मा करीत आहे. पुढील दोन वर्ष ही यात्रा सुरूच राहणार असुन तब्बल दोन वर्षानंतर घरी पोहचणार पोहचणार असल्याचे सांगितले. चांदूर रेल्वे येथे गाडगेबाबा मार्केटमध्ये पंकज शर्मा याचे आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी, प्रतापराव खंडार, नवीनचंद्र उर्फ अण्णा खंदेडीया, प्रकाश खरूले, निर्मल गुगलीया, भुषण नाचवणकर, विनोद लहाने, रोशन गुगलीया, शैलेश डाफ, अंकुश जोशी, बोबडे यांनी पुप्षहार घालुन कौतुक करीत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर पंकज चांदूर रेल्वेवरून अमरावती, परतवाडा मार्गे उज्जैनकरीता रवाना झाला.