‘डीड फॉर नीड फाउंडेशन’तर्फे शालेय साहित्याचे वाटप

0
567
Google search engine
Google search engine

खराडीतील विकास प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

          पुणे (प्रतिनिधी) : ‘डीड फॉर नीड फाउंडेशन’तर्फे गुरू पौर्णिमेनिमित्त खराडी येथील विकास प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय मागील वर्षी इयत्ता पहिली आणि सातवीतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
           फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रिया कपाडिया, संगीता सक्सेना यांच्यातर्फे शालेय साहित्याचे वाटप झाले. यावेळी त्यांच्यासह शहनाझ चावला यांच्या हस्ते शाळेतील 21 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच मागील वर्षी इयत्ता सातवीत गणितासह विविध विषयांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ‘बाळकृष्ण राठी चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे’तर्फेही शाळेला मदत करण्यात आली. मदत केल्याबद्दल कपाडिया आणि सक्सेना यांचे आभार माणण्यात आले.
           विद्यार्थ्यांना भेट दिलेल्या शालेय साहित्यात गणवेश, बुट आदींचा समावेश होता. दरम्यान, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी शाळेच्या संस्थापिका इंदिरा बांगडे, मुख्याध्यापिका संजिवनी वंजारे, ‘इनर व्हील क्लब पुणे नॉर्थ’च्या अध्यक्षा रेखा जांगडा, सदस्या शीला कर्णिक, रेणू जैन, अंजली हिरेमठ, सायली देशमुख, रूपश्री आचार्य, स्मिता श्रीवास्तव उपस्थित होत्या.