वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी काढली वृक्ष पालखी – जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरखेड दानापूर चे आयोजन

0
459
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – शहेजाद खान 
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ,पक्षीही सुस्वरे आळविती’ या उक्तीप्रमाणे वृक्ष हे आपले सगेसोयरे असून ते निसर्गाची ती एक अलौकिक देणगी आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड दानापूर येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी  आषाढीच्या औचित्यावर वृक्ष पालखी काढली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ,डोक्यावर तुळस व इतर वृक्ष घेऊन घरोघरी जाऊन गावकऱ्यांची जनजागृती केली.
आषाढी महिना असल्याने सर्व वारकरी पायी चालून
पंढरपूर च्या विठू माऊलीकडे पावसाचे मागणे मागत आहे तर दुसरीकडे प्रत्यक्ष ज्या बाबींमुळे प्रत्यक्ष पावसासाठी पोषक ठरणारे वृक्षरोपण किती महत्वाचे आहे हे पटवून देण्याकरिता मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात वृक्ष पालखी चे आयोजन मांजरखेड दानापुर येथील जिल्हा परिषद शाळेने केले. एक मूल एक झाड ही संकल्पना जोपासत शाळेतील ५२ विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले तर शिक्षकांनी सुद्धा ५० वृक्षांचे रोपण केले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात वृक्षपालखी काढली. मुलींनी डोक्यावर तुळसी तर मुलांनी देशी वृक्ष डोक्यावर घेत गावाच्या मध्यभागी वृक्षारोपनाची शपथ घेतली व उपस्थित गावकऱ्यांनी सुद्धा या सामाजिक कार्याचा संकल्प सोडला. शालेय वृक्षपालखीच्या या कार्यक्रमात सरपंच रामदास सुकरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत भोयर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मुरलीधर मुंधडा तसेच मुख्याध्यापक अनिल देशमुख, शिक्षक प्रदीप गायकवाड, ज्योती सावरकर, संगीता देशभ्रतार व विद्यार्थी सहित गावकरी सहभागी झाले होते.