*प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई- पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे*

0
504

अमरावती :-

नांदगांवपेठ एमआयडीसीमधील ज्या कारखान्याच्या प्रदुषीत सांडपाण्यामुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे,फळबागांचे नुकसान झाले अशा कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री अनिल बोंडे यांनी बुधवारी दिले.
त्याचप्रमाणे, शेतकर्यांनी वारंवार तक्रारी करूनही तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्या अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले आहेत. एमआयडीसीमधील एस एम एस या औद्योगिक वापराचे पाणी शुद्धीकरण करणाऱ्या प्रकलपाकडून प्रदूषित पाणी शेतशिवारात सोडण्यात येते. त्यामुळे परिसरातील आसपासच्या विहिरीतील पाण्याचा रंग बदलला व ते पाणी प्रदूषित झाले, अशी नारायणपूर येथील शेतकरी बांधवांची तक्रार होती.
या तक्रारीची दखल कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी तातडीने घेतली आणि मंत्रालयात अधिकारी, शेतकरी प्रतिनिधि यांची बैठक आयोजित करण्यात आली,या बैठकीत शेतकर्या़चे प्रतिनिधि म्हणून ज्ञानेश्वर बारस्कर उपस्थित होते,तर एमआयडीसीचे मुख्य अभियंता श्री झंझाड,प्रदुषण नियंत्रणचे एन एस लोहनकर हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. बोंडे म्हणाले की, याप्रकरणी संबंधित कंपनी विरूध्द तातडीने कारवाई करण्यात यावी. शेतकरी बांधवांकडून तक्रार प्राप्त होताच त्याबाबत तत्काळ कारवाई होणे गरजेचे होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.