शेतात डवरणी करीता गेलेल्या युवकाचा शेतातच मृत्यु ,मृत्युचे कारण अस्पष्ट – घुईखेड येथील घटना

0
1256
Google search engine
Google search engine
घुईखेड – (वार्ताहर) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील एका शेतात डवरणी करीता गेलेल्या एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यु झाला असुन मृत्युचे कारण अस्पष्ट आहे.
प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील अंकुश देविदास मेश्राम (वय ३०) हे गुरूवारी सकाळी ११ वाजता शेतात डवरणी करण्याकरिता बळीराम सुनगारे यांच्या शेतात गेले होते. परंतु मृतक अंकुश मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या कडून दारू पिऊन डवरणी करता येत नाही म्हणून त्याला इतरांनी बसण्यास सांगितले व डवरणीकरीता सुरूवात केली. मात्र डवरणी सुरू असतांना इतर मजुरांना काही वेळाने अंकुश मेश्राम मृतावस्थेत दिसला. मात्र मृत्यु नेमका कशाने झाला याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. चांदूर रेल्वे ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता मृतदेह रात्री आणला होता, शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण समजु शकणार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉ. सुरेन्द्र कोहरे घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला. तळेगाव दशासरचे ठाणेदार गोपाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहे. अंकुशच्या मागे आई – वडील, पत्नी, १ मुलगा असा आप्तपरिवार आहे.