मॅकमिलन पब्लिकेशन व एकवीरा स्कूल ग्रुप तर्फे एकविरा स्कुल ऑफ ब्रिलियंट्स , अमरावती येथे कार्यशाळा संपन्न

0
911
Google search engine
Google search engine

अमरावती :-

मॅकमिलन पब्लिकेशन व एकवीरा स्कूल ग्रुप तर्फे एकविरा स्कुल ऑफ ब्रिलियंट्स , अमरावती येथे कार्यशाळा संपन्न
विद्यमाने एकविरा स्कूल ग्रुप च्या सर्व शाखेकरिता कार्यशाळा ठेवण्यात आली होती सदर कार्यशाळेकरिता दिव्या लखेरा , नागपूर यांना बोलाविण्यात आले होते . ट्रेनिंग मध्ये आजच्या युगातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गरजा तसेच वेग-वेगळ्या शिक्षण पद्धती वर वेगवेगळ्या व्हिडीओ फीत , आणि गतीविधी द्वारे दिव्या लखेरा यांनी शिक्षकांचे उद्बोधन केले. सदर कार्यशाळेत एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स, अमरावती , दर्यापूर, मोर्शी , अकोला या शाखेचे सुमारे १५० शिक्षकांनी आपली उपस्थिती नोंदविली.
सदर कार्यशाळेस श्री. तुषार चव्हाण-(प्राचार्य), श्री. राजेंद्र तटस्कर (उप-प्राचार्य), पूनम उताले (मुख्याध्यापिका) दर्यापूर शाखा, श्री.मंगेश वाळके (उप-प्राचार्य), सौ.अनिता खेडकर, सौ.वासाणकर मोर्शी शाखा , सौ.नेहा चव्हाण (प्राचार्या) अमरावती शाखा व सौ. सोनाल लांडे अकोला शाखा , श्री.मिलिंद व श्री.गजानन प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे संचालन सौ. उज्वला गायकवाड व आभार प्रदर्शन नैना लालवाणी ने केले. अश्या प्रकारचे विविध कार्यशाळा सदर शाळा नेहमीच नियोजित करतात ज्यामुळे शिक्षक आजच्या काळाच्या विद्यार्थी शिकविण्याकरिता  तयार होतात.