*अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर येथील जागा निश्चित – कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे*

0
804
Google search engine
Google search engine

 

*मुंबई:-*
अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असून कोंडेश्वर येथील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.बोंडे बोलत होते.
अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार कोंडेश्वर येथील जागा निश्चित झाली असून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देशही डॉ.बोंडे यांनी दिले.

*वाळलेल्या संत्रा झाडांना अनुदान*

ज्या शेतकऱ्यांचे संत्र्यांचे झाड पाण्याअभावी वाळून गेले असेल अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत मदत देण्यात येणार आहे, असेही डॉ.बोंडे यांनी सांगितले.
यावेळी सर्वश्री आमदार रवी राणा, रमेश बुंदिले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव कि.म. जकाते, अर्थतज्ज्ञ मनीष घोटे आणि अमरावती येथून किरण पातूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.