एक विवाह ऐसा भी – लग्न समारंभातुन आगळा वेगळा जलजागर :- जलसंवर्धनासाठी जलसंदेश

0
1368

आकोटः संतोष विणके

स्थानिक बिलबिले मंगल कार्यलयात गणोरकार परीवार सोमवार वेस, अकोट सोनार परीवार रा. करजगांव यांच्या कडील लग्नसमारंभात एका आगळया वेगळया पदधतीने जलसर्वधनाचा संदेश सर्व व-हाडी मंडळीनां देण्यात आला.या अनोख्या लग्नसमारंभाची गावात एकच चर्चा होती.

आजच्या हया युगात पाण्याच्या एका एका थेंबाचे महत्व् असुन सध्या एक समस्या निर्माण झालेली आहे कारण की फक्त 0.006% हे पाणी पिण्या करीता उपलब्ध् असुन 97% हे पाणी खारे असुन केवळ 3% पाणी फक्त भुमीगत आहे, जर लोकांनी पाण्याचा वापर योग्यरितया केल्या नाही तर अतिशय हाल मानवाला तथा प्राणीमात्रांना सोसावे लागतील हि बाब लक्षात ठेवुन रोटरीचे माजी अध्यक्ष अविभाऊ गणोरकार,विनयराव गणाेरकार तथा गणोरकार परीवाराने त्यांच्या येथिल लग्न समारंभांत , जल हि जीवन है , जल है, तो कल है, पाणी की रक्षा देश की सुरक्षा , जल हि जिवन है, आओ मिलकर इसे बचाए अश्या प्रकारचे अनेक संदेश लग्न मंडपात पोर्स्टरच्या मार्फत लावुन जलजागृती केली. एवढेच नव्हे तर संगिताच्या कार्यक्रमा मध्ये वेळोवेळी जल संवंर्धनाचे संदेश मिमिक्री मार्फत देण्यात येत होते. त्या सोबतच यावेळी जल बचतीची प्रश्न मंजुशा रोटरीचे अध्यक्ष् नंदकिशोर शेगोकार यांनी व-हाडी लोकांना चालता बोलता प्रश्न् विचारुन हया कार्यक्रमात सहभागी केले, यानिमित्याने आगळी वेगळ्या पदधतीने जलजागृती करण्यात आली. हया स्वागत समारंभात अकोट शहरातील अनेक नामवंत लोकांनी उपस्थिती दर्शवली ज्या मध्ये प्रभाकरराव गणगणे, सुरेशसेठ अग्रवाल, हरकंड, महेश गणगणे , येवतकार, जेसीआय चे अध्यक्ष निलेश हाडोळे यांनी उपस्थित राहुन जलसंवर्धनाच्या संदेशाची स्तुती केली. हया कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता रोटरी क्लबचे सदस्य् उदध्वराव गणगणे, शिरीष पोटे, शाम शर्मा, अनंता काळे, संजय बोरोडे, अनेकांनी प्रयत्नं केले अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.