येवदा येथे शाळा परिसरात गुटख्याची सर्रास विक्री, प्रहारचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन केदार व येवदा येथील पोलीस विभागाला निवेदन

0
644
Google search engine
Google search engine

बंदी न केल्यास १५ ऑगस्टला उपोषण…

येवदा :प्रतिनिधि :-
दर्यापुर तालुक्यतातील येवदा येथे ऐन शाळा परिसरात गुटख्याची सर्रास विक्रि सुरू आहे.याकडे पोलिस विभागासह अन्न व औषध प्रशासनाचे हेतुपुस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत ही गुटखा विक्रि त्वरीत बंद न केल्यास येत्या १५ ऑगस्टपासून येवदा येथील गांधी चौक आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन केदार व येवदा येथील पोलिस विभागाला निवेदन देण्यात आले आहे. शाळा परिसरात गुटख्यावर बंदी आहे तसेच शासनाने सरसकटच गुटख्याची बंदी केल्यानंतरही थेट शाळा परिसरातच खुटख्याची सर्रास विक्री सुरू असणे ही स्थानिक प्रशासनाकरिता खंताची बाब आहे.याचा दुष्परीणपाम शाळेतील विद्यार्थ्यांवर पडत आहे.याकडे येवदा पोलिस विभागाने लक्ष्य देवुन येथील गुटखा बंदी करावी या आशयाचे निवेदन प्रहारच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी पोलिस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे.येत्या १४ ऑगस्ट पर्यंत येथील गुटखा बंदी करून कारवाई न केल्यास १५ ऑगस्टपासून येथील गांधी चौकात आमरण उपोषण करू असा इशार अन्न व औषधे प्रशासन सह पोलीस विभागाला प्रदीप वडतकर यांनी निवेदनातुन दिला आहे.