जेसीआयच्या आरोग्यम् शिबीराचा आकोटवासियांनी घेतला लाभ

0
621
Google search engine
Google search engine

 

अकोटः ता.प्रतीनिधी

जेसीआय अकोट व ए मार्ट आयोजित आरोग्यम् तपासणी शिबिराचा शहरवासीयांनी लाभ घेतला. आरोग्यम् तपासणी द्वारे रक्ताच्या महागड्या एकूण ६५
प्रकारच्या तपासण्या जनसामान्यासाठी फक्त ११०० रु मध्ये करण्यात आल्या.जेसीआय दरवर्षी हे शिबिर आयोजित करत असते.आजच्या या धकाधकीच्य जीवनात व तानतनावाच्या जीवनात शरीरात निरंतर बदल होतअसतात या आधुनिक युगात दवाखान्या चा खर्च उत्पन्नाच्या पेक्षा किती तरी अधिक लागु शकतो आपल्याला येणारे रोगाचे लक्षण हे आपल्याला अगोदर माहित असणे गरजेचे आहे. करिता जेसीआय अकोट हे दरवर्षी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करत असते
ह्या शिबिरात रक्ताच्या विविध तपासण्यामध्ये थायरॉइड प्रोफाइल(३), व्हिटामिन डी( ३),व्हीटामिन बी(१२), लिपिड प्रोफाइल(८), लिव्हर प्रोफाइल(११), रिनल प्रोफाइल(८), डायबिटीज प्रोफाइल(२), टेस्टोस्टिरॉन, आयरन प्रोफाइल(३), व हीमोग्राम(२८) इत्यादि तपासण्या करून देण्यातआल्या शिबीरात शहर ठाणेदार संतोष महल्ले सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, रोटरीक्लब चे अध्यक्ष नंदकिशोरजी शेगोकार यांनी सुध्दा सहभाग घेतला. या शिबिराचे प्रकल्प प्रमुख डॉ धर्मपाल चिंचोळकर होते सह प्रकल्प प्रमुख डॉ सतीश म्हैसने,डॉ रोहित व्यवहारे,डॉ स्वप्नील सोनटक्के,राहुल गावंडे,अनुप गव्हाणे होते.प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सचिव संदीप चांडक,अरविंद मोडक, पवन ठाकूर ,हेमंत गणगने ,योगेश राठी,भारत वासे, अतुल भिरडे, संजय शेळके,अभिषेक दुबे ,विनोद कडू,मुरेकर सर, विवेक गणोरकर, संदीप भुस्कट, राजेश गोगटे यांनी मोलाचे योगदान दिले.तसेच अध्यक्ष निलेश हाडोळे,zvp प्रशांत खोडके पूर्वध्यक्ष गोपाल गांधी, बिपिन टावरी तसेच सर्व पूर्वध्यक्षांचे मोलाचे सहकार्य लाभले .असे जेसीआय चे जनसंपर्क अधिकारी जेसी निलेश इंगळे कळवितात.