बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख – राष्ट्रीय हिंदु आंदोलनाद्वारे राष्ट्रप्रेमी अन् हिंदुत्वनिष्ठ यांची कारवाईची मागणी 

0
611
Google search engine
Google search engine

अमरावती :-

 

*हिंदुरक्षक महाराणा प्रताप नसते, तर आज हिंदु समाज अस्तित्वात नसता. अशा या महाराणा प्रताप यांचा बालभारतीच्या इयत्ता ७ वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकात एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. महाराणा प्रताप यांची महानता लक्षात घेता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमानच केला आहे. हिंदुस्थानातील राष्ट्रपुरुषांचा आदर हिंदुस्थानात नाही, तर काय परदेशात ठेवला जाणार आहे काय ? असा संतप्त प्रश्‍न करत राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सेक्युलरवाद्यांचा प्रभावामुळे हिंदु राजे यांचा उपमर्द आणि मोगलांचा उदोउदो चालू आहे. हे अक्षम्य आहे. हिंदु समाज हे कदापि सहन करणार नाही. राष्ट्रपुरुषांचा उल्लेख आदरार्थीच व्हायला हवा. राष्ट्रपुरुषांचा अवमान ही इतिहासाशी प्रतारणा आणि राष्ट्राशी द्रोह केल्यासारखेच आहे. त्यामुळे महाराणा प्रताप यांचा चुकीचा उल्लेख करणार्‍या संबधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पाठ्यपुस्तकातील एकेरी उल्लेख तात्काळ वगळून पाठ्यपुस्तकात योग्य ते पालट करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली. २६ जुलै या दिवशी सायंकाळी ४ वाजता राजकमल चौक या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी हिंदु जनजागृती समितीचे नीलेश टवलारे, युवा संघटक हर्षद खानविलकर, अमोल जगदाळे, मिलिंद साखरे, आनंद डाऊ,योग वेदांत समितीचे मानव बुद्धदेव, अखिल भारत ब्राह्मण महासभेचे रमेश छागाणी, राजेंद्रसिंह राजपूत, श्रीराम सेनेचे विजय दुबे, राहुल तंबोल, किशोर कडवे, अनिल शुक्ला असे 45 हुन अधिक धर्मभिमानी उपस्थित होते*

*गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !*

महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने गोवंश हत्या आणि गोतस्करी बंद होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. याउलट गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. बदलापूर, ठाणे येथील गोरक्षक श्री. चेतन शर्मा 24 जूनला पोलिसांसह अवैध पशूवधगृहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर 350 हून अधिक धर्मांध कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले. तसेच श्री. विकास गोमसाळे आणि श्री. मयूर विभांडिक या गोरक्षकांवर 18 जूनला 80 हून अधिक धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. गोमातांच्या रक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणार्‍या गोरक्षकांना आज कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे त्यांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. गोरक्षकांवर आक्रमणे करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी, देशभरातील अवैध पशूवधगृहे तत्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्याही या वेळी आंदोलनामध्ये करण्यात आल्या.

आंदोलनातील अन्य मागण्या : १. हिंदु धर्मासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या नागा साधूंना अपकीर्त करण्याचा प्रयत्न लाल कप्तान चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे लाल कप्तान चित्रपटावर बंदी आणावी.

२. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना जामीन मिळाला असला, तरी त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत