पुत्र व्हावा ऐसा गुंडा, शेतशिवारातच केला बापाला थंडा

0
543
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- पोलीस स्टेशनचे हद्दीतील पश्चिमेला ६ कि. मी. अंतरावर असलेल्या मिनघरी गांवात दादाजी राघोजी खोबरागडे, वय ६० वर्ष हे प्रतिष्ठीत शेतकरी सहकुटुंब राहत होते. त्यांना राजेश नावाचा मुलगा व वैशाली नावाची मुलगी आहे. तापट व रागीट स्वभावाचा राजेश कोणतेही काम न करता ऐतखाऊ असून वडीलांना नेहमीच पैशासाठी त्रास देऊन मारहाण करायचा. अशातच दादाजी खोबरागडे यांना शेतीचे सौद्यातून ६,००,०००/- लाख रुपये मिळाले. मुलाचे मारहाणीच्या भितीने मयताने राजेशला ४,००,०००/- रुपये दिले. वडीलांनी मुलाला दिलेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, त्याचा राग मनात धरून व उरलेल्या जमिनीवर पुर्ण हक्क मिळविण्याच्या लालसेपोटी आड येत असलेल्या वडीलाचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याने मन पक्के केले. व दोन साथीदारांना सोबत घेऊन दिनांक – २२-०७-२०१९ चे रात्री ७-३० वाजता घराशेजारीच असलेल्या शेतात साथिदारांचे सहकार्याने वडीलांचा गळा आवळून खुन केला. राजेशने सदर बाब अर्जदार बहीन व जवळचे नातेवाईक यांचे पासुन लपवून ठेवली. व सदरचा मृत्यू आकस्मिक झाला असल्याचा बनाव करून खरे कारण लपवून ठेवण्यात यशस्वी झाला. परंतु कुमारी वैशाली दादाजी खोबरागडे मयताची मुलगी राहणार मिनघरी हिने दिनांक २४/७/२०१९ रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही ला येऊन माझे वडीलाचा मृत्यू आकस्मिक नसून हत्या करण्यात आली आहे. त्याची योग्य चौकशी होऊन दोशीवर कायदेशीर कारवाई करावी असा अर्ज दिल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. प्रकरण चौकशीसाठी घेतले असता, असे निदर्शनास आले की, मयताचा मृत्यू आकस्मिक असतांना कायदेशीर बाबी पुर्ण न करताच वडीलाचे प्रेताला घाईगडबडीत अग्नि देऊन व अंत्यसंस्कार पुर्ण करून पुरावा नष्ट केल्याने , व त्याचे विरोधात बहिण वैशाली हिने दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन, सिंदेवाही येथे अपराध क्र. ३९६/१९ कलम ३०२,२०१ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात नामे राजेश दादाजी खोबरागडे रा. मिनघरी याला अटक करण्यात आली असुन त्याचे सोबत इतर दोन साथीदारांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. निशिकांत रामटेके हे करीत आहेत.