अमरावती / सुरज देवहाते –

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव यांच्या न्याय व हक्कासाठी 31 जुलै रोजी संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जेलभरो आंदोलन सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार श्री बच्चू कडू यांनी काल अमरावती येथे झालेल्या प्रेस कॉन्फरन्स ला माहिती दिली.  सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासोबत 50 टक्के नफा गृहीत धरून हमीभाव जाहीर करावा, राज्याने व केंद्राने जाहीर केलेले हमीभाव यातली तफावत रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी, 50 टक्केच्या हात आणेवारी असलेल्या सर्व महसूल मंडळ यांना तातडीने मदत जाहीर करावी, त्यात बदल करून शेतकऱ्यांना मागील वर्षीचे पिक विमा रक्कम तातडीने देण्यात यावी शेतमजुरांना अपघात विमा लागू करण्यात यावा , कामगारांच्या किमान वेतनात वाढ करावी, विधवा महिलांना शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून दहा हजाराचे अनुदान दरवर्षी देण्यासोबतच त्यांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण देण्यात यावे, ऊस पिकांची शासनाकडून जाहीर अनुदान तातडीने प्रदान करण्यात यावे ,आदिवासी बांधवांचे प्रलंबित असलेले वणपट्टा वाटप प्रकरण तात्काळ निकाली काढावे, अशा विविध प्रकारच्या 15 मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने 31 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहेत या आंदोलनात जिल्ह्यातील तमाम शेतकरी शेतमजूर बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी केले आहे