रस्त्याचे अवैध प्रकारे काम चालू

0
597

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने मध्ये बुलढाणा जिल्ह्यात होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस .

 

शेगांव:- काही दिवस आगोदर आम्ही आपल्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होणाऱ्या शेगाव ते गौलखेड या साडेचार किलोमीटर रस्त्याची बातमी दाखवली होती, या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील अधिकारी आणि कॉन्टॅक्टदार यांनी या कामाला मुदत संपल्यानंतर आता सुरुवात केली, परंतु काय होत असलेले काम हे वैध आहे का, असा प्रश्न येथे आज निर्माण होतो ,कारण जे अधिकारी जो ठेकेदार मागील एका वर्षात कामाला सुरुवात सुद्धा करू शकले नाही ते आता हे काम किती दिवसात थातूर-मातूर पणे पूर्ण करतील, आणि त्या कामाचा दर्जा काय राहील हे समजणे महत्त्वाचे आहे, पण ज्या अधिकाऱ्यांना शासन भरगच्च पगार देते ते अधिकारी त्यांचं काम योग्य रीतीने का पार पाडत नाही, ज्या ठेकेदारांना ही कामे मिळतात हे ठेकेदार आपली कामे वेळेच्या आत का पूर्ण करत नाही, हा एक चिंतेचा विषय आहे, परंतु आज आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे ,जि सत्यता आम्ही समोर आणली त्याची दखल शासनाने घेतली असून आता या रस्त्याचे काम “अवैधरित्या” का होईना पण सुरु झाले कारण मुदत संपल्यानंतर होणाऱ्या कामाला अवैधच म्हणावे लागेल जर का हे काम वैध असते तर मिळालेली मुदतवाढ चे फलक सुद्धा येथे लागले असते.

मग रस्त्याच्या कडेला पडलेले गित्ती,मुरूम हा माल कुणाचा शासनाचा, ठेकेदाराचा की चोरीचा अशी चर्चा गावात रंगलेली आहे