श्रद्धासागर येथे वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ

0
626
Google search engine
Google search engine

आकोट:ता.प्रतिनीधी  :-
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे श्रद्धासागर परिसरात वृक्ष लागवड मोहीमेचा वृक्षपुजन करुन शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्री संत वासुदेव महाराज संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महाराज महल्ले यांनी वृक्ष लागवड करुन मोहीमेचा शुभारंभ केला.याआधी लावलेले वृक्ष जगवल्याने श्रद्धासागर परिसर वृक्षवेलींनी हिरवागार झाला आहे.वृक्ष लागवडीचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

श्रद्धासागर मार्ग हिरवागार करण्याचे उद्देशाने २००वृक्ष लागवड करुन त्याचे यथायोग्य संगोपन करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे त्यांनी घोषित केले. विशेष म्हणजे
यापूर्वी श्रद्धासागर येथे लावलेले सर्व वृक्ष जगवित हा परिसर वृक्षवेली, फळाफुलांनी बहरुन गेला आहे हे येथे उल्लेखनीय आहे.
या वृक्षलागवड मोहीम शुभारंभ प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर सचिव रविंद्र वानखडे ,सहसचिव अवि गावंडे व मोहनराव पुं जायले पाटील,विश्वस्त दादासाहेब पुंडेकर,सदाशिवराव पोटे,प्राचार्य गजाननराव चोपडे
अशोकराव पाचडे,महादेवराव ठाकरे,अनिल कोरपे,कानुसेठ राठी,गजाननराव दुधाट,नंदकिशोर हिंगणकर संस्थेचे सहा.व्यवस्थापक दिलिप कुलट आदी उपस्थित होते.