*अटल अर्थसहाय्य योजना जिल्हा समीतीवर अरुण जवंजाळ*

0
1484
Google search engine
Google search engine

आकोटः- महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अंतर्गत ‘अटल अर्थसहाय्य योजने’च्या जिल्हा समीतीवर आकोट येथील भा.ज.पा.चे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा सहकार क्षेत्रात कार्यरत अरुण उर्फ तात्यासाहेब जवंजाळ यांची अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील सहकारी संस्थाच्या व्यवसाय प्रकल्प अहवालांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या २ जानेवारी २०१९ रोजीच्या निर्णयाव्दारे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळा अंतर्गत ‘अटल अर्थसहाय्य योजना’ लागु करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होणा-या संस्थांना उपजिल्हा निबंधक यांच्याकडे नाविन्यपुर्ण प्रकल्प अहवाल सादर करावयाचे आहेत.त्या अहवालाची जिल्हास्तरीय समीती छाननी करुन राज्य स्तरीय समीतीकडे “अटल अर्थसहाय्य योजने” अंतर्गत अनुदान मिळण्याकरीता शिफारस करणार आहे. या समीतीचे राज्याचे सहकार,मदत व पुनर्वसन मंञी सुभाषराव देशमुख हे अध्यक्ष आहेत.अशा अटल अर्थसहाय्य योजना जिल्हा छाननी समीतीवर अरुण प्रल्हादराव जवंजाळ यांची सहकार मंञालयातर्फे अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण जवंजाळ हे गेल्या ३ दशकापासुन सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांनी या अगोदर महानंद मुबंईचे संचालक पद भुषविले आहे ते गेल्या १० वर्षापासुन खरेदी विक्री संंघाचे संचालक आहेत, कृषी उत्पन्न बाजार समीतीवर तज्ञ संचालक म्हणुन कार्यरत आहेत.सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष पद भुषविले असुन सध्दस्थितीत संचालक म्हणुन कार्यरत आहे.त्त्यांच्या नियुक्तीचे सहकार क्षेञात स्वागत करण्यात येत आहे.त्यांच्या नियुक्ती मुळे जिल्ह्यातील सहकारी संस्थांना लाभ होईल असे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.