मेळघाटातील पोपटखेड गेटवरील निसर्ग प्रेमींच्या अडवणुकी विरोधात प्रहारचा आंदोलनाचा ईशारा

0
624
Google search engine
Google search engine

आकोटः ता.प्रतिनीधी

अकोट जवळील मेळघाट वनजीव विभागातील
पोपटखेड गेट वर पर्यटकांच्या होणाऱ्या अडवणुकी बाबत प्रहारने मेळघाट वनपरीक्षेत्र अधिकारी आकोट वन्यजीव विभाग यांना निवेदन देत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

मँजिकल मेळघाटला भेट देण्यासाठी निसर्गप्रेमी तसेच पर्यटक हे अकोटजवळील पोपटखेड गेट मार्गे धारणी, खटकाली,सीमाडोह,चिखलदरा ,हाय पॉईंट येथ जाण्यास पसंती देतात मात्र हे पर्यटक वन विभागाच्या पोपटखेड गेटवर होणाऱ्या जाचक नियमांच्या अडवणुकीने त्रस्त आहेत.विशेष म्हणजे पोपटखेड गेट हे आकोट – धारणी या २०४ क्र. च्या राज्यमहामार्गावर आहे.मात्र तरीही पर्यटकांच्या गाडीची हवा सोडणे त्यांना अपमानजनक वागणुक देणे आदी गंभिर तक्रारीचा उल्लेख प्रहारने आपल्या निवेदनात केला आहे. निसर्गप्रेमीनी मेळघाट मध्ये जाऊ नये का अशा प्रकारचे काही नियम किंवा परिपत्रक असतील तर त्या प्रकारचे फलक आपण लावावे
विनाकारण निसर्गप्रेमींची अडवणूक करू नये अशी मागणीही प्रहारने आपल्या निवेदनातुन केली आहे. पोपटखेड गेटवरील अनागोंदी संदर्भात तात्काळ कारवाई करावी नाही तर निसर्गप्रेमी तथा पर्यटकांच्या हिता साठी उग्र आंदोलन करण्याचा ईशारा प्रहारने निवेदनातुन दिला आहे.