*महा जनादेश यात्रेमध्ये लाखोच्या संखेने सहभागी व्हावे पालकमंत्री डॉ अनिल बोन्डे यांचे आवाहन*

0
966
Google search engine
Google search engine

 

*वरुड*:-
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करीत फिरणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ यत्या 1 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथून आरंभ करण्यात येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष ना अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून राज्यातील सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहें या कार्क्रमाला लाखोंच्या संख्येने सहभागीं व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ अनिल बोन्डे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
याबाबत डॉ अनिल बोन्डे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे कि, संकटात असलेल्या बळीराजासाठी, दलित, पीडीत, वंचित समाज घटकांसाठी, सामाजिक न्यायासाठी व औद्योगिक, शैक्षणिक सांस्कृतिक विकासासाठी, मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी, राज्यातील स्त्री शक्तीसाठी, आणि नव महाराष्ट्राच्या निर्माणासाठी झुंजणारा महाराष्ट्चा खंबीर, कर्तबगार लोकनेता तथा राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना देवेन्द्रजी फडणवीस हे अथक परीश्रम घेत आहे त्यांच्या नेतृत्वातील या महाजानदेश यात्रेचा प्रारंभ येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून दुपारी 12 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथून करण्यात येणार आहे.
या महाजानदेश यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार रामदास तडस, आमदार डॉ सुनील देशमुख, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, अरुण अडसड, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचेसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या महाजानदेश यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ अनिल बोंडे यांनी केले आहे.