स्व. दादासाहेब काळमेघ यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न.

0
513

आकोटः प्रतिनीधी:-

श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे ऑडिटोरियम हॉलमध्ये स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान तर्फे दादासाहेब काळमेघ यांचा 22 वा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाकरराव गणगणे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शशिधरराव खोटरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड गजाननराव पुंडकर, संचालक केशवराव मेतकर, माजी आमदार संजय गावंडे, प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट .अॅड मनोज खंडारे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत गीत प्रा. वावगे व प्रा. वतारे. यांनी सादर केले . दादासाहेब काळमेघ बहुजन समाजाला पुढे आणणारे व्यक्तिमत्व होते. असे उद्गार आपल्या प्रास्ताविकपर भाषणात माजी आमदार संजय गावंडे यांनी काढले. दादासाहेब काळमेघ खुल्या अंतःकरणाचे व मोठ्या मनाचे व्यक्तिमत्व होते. असे उद्गार आपल्या मनोगतातून केशवराव मेतकर यांनी काढले. दादासाहेब नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना वंचित घटकांचा लाभासाठी प्रथम विचार केला. असे मत अॅड गजाननराव पुंडकर यांनी मत मांडले. दादासाहेब अभ्यासू, बुद्धीवादी व्यक्तिमत्व होते. असे उद्गार डॉ ए. एल. कुलट यांनी काढले.तर प्रभाकरराव गणगणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दादासाहेब कसे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते हे पटवून दिले संचालन . अॅड मनोज खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत कोठे यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील बहुसंख्य आजीव सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक व संजय गावंडे यांचा मित्रपरिवार उपस्थित होते.