अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी समतादूत प्रकल्प बार्टी,पुणे अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

0
470

अकोला: प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संस्थेमार्फत समतादूत “वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन” बार्टी,पुणे चे महासंचालक कैलास कणसे व समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केले होते.बार्टी,पुणे अंतर्गत १५/जून ते ३०/सप्टेंबर हा काळ वनोमहोत्सवाचा काळ म्हणून साजरा केला जातो.समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्या अनुषंगाने जिल्हा,तालुका,गाव पातळीवर प्रकल्प अधिकारी तसेच समतादूत यांचेमार्फत वृक्षारोपण सप्ताह व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते.प्रकल्प अधिकारी व समतादूत यांनी या सप्ताहाअंतर्गत जिल्ह्यातील हिंदू स्मशानभूमी,मुस्लिम ख्रिक्चन दफनभूमी,तालुका स्तरीय पोलीस स्टेशन,प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय,शासकीय वस्तीगृह,मदरसा,ग्रामपंचायत कार्यालय परिसर इ.ठिकाणी वृक्षारोपण सप्ताह व प्रबोधन कार्यक्रम असे यशस्वी आयोजन संपूर्ण जुलै महिन्यात केले.