सिंदेवाही लोनवाही येथे रानडुक्कराचा गावठी डुकारात शिरकाव, सतर्क राहण्याची गरज

0
435
Google search engine
Google search engine

सिंदेवाही :- लोनवाही येथिल रामनगर हेटी परिसरात रानडुक्कर गावठी डुकारात मिसळुन सोबत राहत असून मागील दोन दिवस या परिसरात आढळून आल्याने या भितीचे वातावरण झाले आहे.
या परिसरात गावठी डुकाराचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या परीसराला लागुन घोडाझरी सिंचन विभागाचे पडीत वसाहत लागून आहे. तसेच या परिसराला जंगल आहे.
जंगलातील रानटी डुकार याच परिसरात नेहमी शिरकाव करतात परंतु चक्क रानटी डुकर गावठी डुकारात मिसळुन या परिसरात फिरत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे या जंगली डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.