देशाचा पोशिंदा बळीराजा चा सवाल?

0
417

तालुका प्रतिनिधि सिंदेवाही- देशाचा पोशिंदा शेतकरी, ज्याचे शेतात धान, गहू, बाजरी, तुर, उडीद, मुग, हरभरा, कापूस, उस आदि पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांच्या भरोस्यावर उड्या मारणारा पांढरपेशा समाज शेतकऱ्याने उत्पादन केलेल्या धान्यावर उड्या मारतो. बिच्चारा शेतकरी सहकुटुंब शेतात राबून सर्व प्रकारचे धान्य पिकवू न आपल्या मुलाबाळांची, कुटूंबातील सदस्यांची इच्छा मारून हरामखोर पांढरपेशा वर्गाला देशाचा पोशिंदा म्हणून पोसतो.
शेतीत कसून दिवसभर राबराब करून त्याला शेतीत पिकलेले अन्न सुद्धा चारघास सुखाने खाता येत नाही. दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येऊन शेतीसाठी घेतलेले सावकाराचे व बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या हा पर्याय त्याचेसमोर उभा ठाकतो. निसर्गाच्या अवकृपेने शेतीत उत्पादन नाही, कुटूंबातील सदस्यांचे हाल पाहावले जात नाही. त्यामुळे नैराश्यातून व कर्जबाजारी पनाला कंटाळून आत्महत्या करावीच लागते. त्यातून सावरण्यासाठी व शेतकऱ्याला त्याचे पायावर उभे करण्यासाठी सरकारने आखलेल्या योजना निरर्थकच म्हणावे लागेल. कारण शेतकऱ्यांना पुरेसे बि., बियाणे घेन्यासाठी, खतासाठी, मजुरांना मजुरी देन्यासाठी आवश्यक असलेला पैसा त्याचेकडे उपलब्ध नसतो. असतो. त्यामुळे शेती कशी करायची या विवंचनेत असतांनाच त्याला निसर्गाचा मार सुद्धा खावा लागतो. इकडे विहीर, तिकडे आळ अशा द्विधा मनस्थितीत जिवन व्यथित करीत असतांनाच निसर्गाच्या अवकृपेने शेतीची माती होऊन बसते. व निसर्गापुढे हात टेकायला त्याला भाग पाडले जाते. असे अनेक प्रश्न आवासून उभे ठाकले असतांना सुद्धा नव्या दमाने, नव्या उमेदीने शेतकरी ताठ मानेने उभा राहन्यास सज्ज होतो. शेतशिवारात शासकीय योजनेतून उभारलेली सिंचन विहीर, विहीरींवर भरपूर पान्यासाठी मारलेले बोअर, विहिरीला शेतीचे उत्पन्न घेन्याईतपत मुबलक पाणी, पण विजवितरण कंपणीच्या बेताल व भोंगळ कारभारामुळे विहीरीत पाणी असुनही नेहमिच्या खंडीत विजपुरवठ्याने पुरेसे उत्पन्न घेता येत नाही. परिणामी कर्जबाजारी असलेला शेतकरी कर्जातच घट्ट पाय रोऊन बसतो. त्याची कर्जातून मुक्ति होने नाहीच.शासनाने दिलेले अत्यल्प व तुटपुंज्या साहाय्याने एक ना धड भाराभर चिंध्या याप्रमाणे शेतकऱ्याची गत झाली आहे. तरीपण हिंमत न हारता देशाचा पोशिंदा म्हणवनारा बळीराजा देशातील जनतेला व देशाच्या सरकारला आव्हान करतो, आम्हाला फक्त पावसाने साथ दिली पाहिजे. बाकी सरकारला तर आम्हीच पोसतो.