आकोटचे प्रशिक्षक मुकल देशपांडे यांचा बँकॉकमध्ये डंका

535

 

अकोटःप्रतिनिधी-

वर्ल्ड बेसबॉल सॉफ्टबॉल कॉनफेडरेशन व सॉफ्टबॉल एशिया द्वारा संयुक्त विद्यमाने व थायलंड सॉफ्टबॉल संघटनेचे सहकार्याने कासेटार्ट युनिव्हर्सिटी, बॅंकॉक थायलंड येथे दिनांक २० ते २२ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल टुरनामेंट आंतरराष्ट्रीय टेक्निकल कमिश्नर पदाचे प्रशिक्षण आकोट च्या मुकुल माधवराव देशपांडे यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
भारतीय सॉफ्टबॉल संघटनेने सदर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी त्यांना भारताचे तांत्रिक अधिकारी म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबॉल स्पर्धेत टुरनामेंट टेक्निकल कमिश्नर हे पद नव्यानेच सुरू करण्यात आले असून या पदावर काम करण्यासाठी तांत्रिक अधिकार्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. जागतिक स्तरावर अमेरिके नंतर झालेले दुसरेच प्रशिक्षण असुन एशिया मधिल अशा प्रकारचे हे पहिलेच प्रशिक्षण होते. यातुन सुयोग्य पद्धतीने व वेळेबरहुकुम आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा संचलन व नियोजन करणारे आयुक्त स्तरावरील तांत्रिक अधिकारी तयार करण्यात येत आहेत.

मुकुल देशपांडे हे श्री नरसिंग विद्यालय आकोट येथे शारीरिक शिक्षक या पदावर कार्यरत असुन ते सॉफ्टबॉल या खेळाचे राष्ट्रीय पंच आहेत. महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचे मुख्य पंच म्हणून त्यांना जवाबदारी देण्यात आली असून भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे ते मुख्य पंच समन्वयक म्हणून कार्य करीत आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या द्वारे आयोजित अनेक राज्य व राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा, संघटनेच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धा व तसेच पुणे महापौर चषक सॉफ्टबॉल स्पर्धा व महाराष्ट्र सॉफ्टबॉल प्रिमियर लीग आदी स्पर्धेत त्यांनी तांत्रिक समिती अध्यक्ष व मुख्य पंच म्हणून समर्थपणे यशस्वीरीत्या कामकाज सांभाळले आहे.
संपूर्ण एशिया मधुन १२ तांत्रिक अधिकारी या प्रशिक्षणाला आमंत्रित करण्यात आले होते व त्यात मुकुल देशपांडे हे भारतातील एकमेव तांत्रिक अधिकारी म्हणून सहभागी झाले होते हे येथे उल्लेखनीय.
मुकुल देशपांडे यांच्या या यशाबद्दल भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे मा. महासचिव श्री मौर्य, राष्ट्रीय खनिजदार श्री श्रीकांतजी थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्री प्रवीणजी अनावकर, इंदौर, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे डॉ. श्री प्रदीप तळवेलकर उपाख्य श्री गुरूजी, जलगाव, अकोला जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव श्री नाजुकराव पखाले तसेच राज्यभरातील सॉफ्टबॉल पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी व खेळाडूंनी मुकुल देशपांडे यांचे अभिनंदन केले असुन त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात