ऊंच पुलाअभावी उमा नदीवरील विसच्यावर गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला

0
505
Google search engine
Google search engine
तालुका प्रतिनिधी :- सिंदेवाही तालुक्यातुन एकमेव वाहणारी उमा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या ऊंचीअभावी विसच्या वर गावांतील पावसाळ्यात तालुक्यातील  संपर्क दुसर्‍यांदा तुटलेला दिसुन येतो.
         सिंदेवाही तालुक्यातुन वाहणारी उमा नदीचा उगम सातबहिणीच्या डोंगरातून असून मोठय़ा प्रमाणात या परिसरातील नदी नाले मिळत असल्याने ती तालुक्यात मोठी बनते.
सिंदेवाही मोहाळी रोडवरील कळमगाव गन्ना या गावाजवळील नदीवर पूल उभारण्यात आला होता तसेच वासेरा, लाडबोरी  पुलाला अनेक वर्षे झाली परंतु ऊंचीअभावी अनेकदा या परिसरातील गावांंचा पावसाळ्यात तालुक्याशी संपर्क तुटत असतो.
      या वर्षी झालेल्या जोरदार पाऊसामुळे त्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत गेल्याने या परिसरातील त्या विसच्या वर गावातील संपर्क तालुक्याशी तुटलेला होता. त्यामध्ये कळमगाव गन्ना, नलेश्वर मोहाळी, कुकडहेटी, विसापूर, चारगाव, ब्राह्मणी, मोहबळी, इटोली तसेच वासेरा, शिवणी परीसरातील गावाचा समावेश होता.
                 या गावातील नागरिकांना तालुक्याशी संपर्कासाठी याच पुलावर अवलंबून राहावे लागते. या परीसरातील मुलांना शालेय महाविद्यालयीन व्यावसायिक शिक्षणासाठी तालुक्याशी नेहमी येजा करावे लागते. तसेच सामान्य माणसाला आर्थिक रोजंदारीवर जाण्यासाठी तालुक्याशी संलग्नित राहावे लागते.
           अती पावसाळ्यात उमा नदीला लवकर पुर येत असल्याने त्या पुलावरून रहदारी बंद होते, त्यामुळे या गावाशी शासकीय कामकाज संपर्क बंद असते. अनेक शिक्षकवर्ग वेळेवर पोहचु शकत नसल्याने शाळांमध्ये सुट्टी द्यावी लागते असा प्रसंग नेहमी उद्भवतो.
           या उंच पुलाअभावी जर या गांवाना तालुक्याशी संपर्क करावयाचा असल्यास येथील नागरिकांनासुमारे 30 किमी अंतर कापून जावे लागते त्यासाठी इतर मार्गाचा वापर करावा लागतो परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना ते शक्य होत नाही.
उमा नदीवरील त्या पुलामुळे अनेक आर्थिक नुकसान सोसावे लागते तसेच पुरामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येवुन शेतपिकाचे नुकसान होत असते त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन लक्ष केंद्रित केले. वारंवार तक्रारी करूनही या पुलाची उंची वाढली नाही त्यामुळे त्वरित पुलांची उंची वाढवून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.